माणकेश्वर, ढाेकीत जुगार अड्ड्यांवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:33 IST2021-03-18T04:33:04+5:302021-03-18T04:33:04+5:30
उस्मानाबाद : पाेलीस दलाच्या वतीने जुगार विराेधी कारवाई सुरू केल्या आहेत. परंडा, तसेच ढाेकी पाेलीस ठाण्याने १५ मार्च राेजी ...

माणकेश्वर, ढाेकीत जुगार अड्ड्यांवर छापे
उस्मानाबाद : पाेलीस दलाच्या वतीने जुगार विराेधी कारवाई सुरू केल्या आहेत. परंडा, तसेच ढाेकी पाेलीस ठाण्याने १५ मार्च राेजी माणकेश्वर, ढाेकी येथील जुगार अड्ड्यांवर अचानक छापा मारला. या कारवाई जुगाराच्या साहित्यासह राेख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील एका हाॅटेलला लागून असलेल्या झाडाखाली सोरट नावाचा जुगार सुरू हाेता. ही माहिती मिळताच, परंडा पाेलिसांनी अचानक छापा मारला. या कारवाईत जुगाराच्या साहित्यासह राेख ४१० रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणी रमेश शंकर चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढाेकी पाेलिसांनीही गावातीलच पेट्राेलपंप चाैकात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई केली. या कारवाईत जुगाराच्या साहित्यासह ३०० रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणी ढाेकी ठाण्यात मजीद रशीद शेख याच्याविरुद्ध गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.