‘राेहयाे’चा ४४ हजारांवर वैयक्तिक कामांचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:09 IST2021-09-02T05:09:30+5:302021-09-02T05:09:30+5:30

राेजगार हमी याेजनेसाठी निधीची कमतरता नसते. त्यामुळे जेवढी कामे हाेतील, त्याप्रमाणात निधी केंद्र व राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिला ...

Raheya's personal work plan on 44,000 | ‘राेहयाे’चा ४४ हजारांवर वैयक्तिक कामांचा आराखडा

‘राेहयाे’चा ४४ हजारांवर वैयक्तिक कामांचा आराखडा

राेजगार हमी याेजनेसाठी निधीची कमतरता नसते. त्यामुळे जेवढी कामे हाेतील, त्याप्रमाणात निधी केंद्र व राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिला जाताे. दरम्यान, शासनाने राेहयाेच्या माध्यमातून सार्वजनिक कामांसाेबतच आता वैयक्तिक कामे घेण्यासही प्राधान्य दिले आहे. नुकताच राेहयाे कक्षाकडून समृद्ध लेबर बजेट सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार आठ तालुक्यांतून मिळून कुटुंबांनी ४४ हजार २११ कामांची मागणी नाेंदविली आहे. ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी ८७ लाख ६६ हजार मनुष्य दिवस लागणार आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी २२४ काेटी १८ लाख रूपये कुशल रक्कम तर १८५ काेटी ८० लाख रूपये अकुशल रक्कम लागणार आहे. म्हणजे नियाेजनानुसार ही कामे पूर्ण केल्यास जिल्ह्यात राेहयाेच्या माध्यमातून ४०९ काेटी ७८ लाखांचा निधी येणार आहे. दरम्यान, कागदावरील हा आराखडा प्रत्यक्षात उतरविण्याचे प्रशासनासमाेर आव्हान असणार आहे. कारण बहुतांश कामे वैयक्तिक स्वरूपाची आहेत. त्यामुळे जिल्हा, तालुका तसेच गावस्तरावरील यंत्रणा अधिक सतर्क करून याेजनेला गती द्यावी लागणार आहे.

काेट...

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या सूचनेनुसार राेहयाे कक्षाकडून समृद्ध लेबर बजेट तयार करण्यात आले आहे. जिल्हाभरातील कुटुंबांकडून ४४ हजारावर कामांची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित कामांवर ४०९ काेटी रूपये खर्च हाेऊ शकतात. आराखड्यातील अधिकाधिक कामे पूर्ण करण्याच्या अनुषंगाने मायक्राे नियाेजन करण्यात आले आहे.

-व्ही. के. खिल्लारे, उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक, राेहयाे.

दृष्टिक्षेपात आराखड्यातील कामे

तालुका कामे

भूम २६१७

कळंब ५६३४

लाेहारा ३७३६

उमरगा ७५११

उस्मानाबाद ८२०४

परंडा ५६२६

तुळजापूर ४७९६

वाशी ६०८७

Web Title: Raheya's personal work plan on 44,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.