३० सप्टेंबरपर्यंतचा कोटा फुल्ल, लायसन्स बाद होण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:37 IST2021-09-23T04:37:01+5:302021-09-23T04:37:01+5:30
कोरोना काळात संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कार्यालयातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोरोना काळात मुदत संपलेले लायसन्स, फिटनेस प्रमाणपत्र, ...

३० सप्टेंबरपर्यंतचा कोटा फुल्ल, लायसन्स बाद होण्याची भीती
कोरोना काळात संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कार्यालयातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोरोना काळात मुदत संपलेले लायसन्स, फिटनेस प्रमाणपत्र, पासिंग यासह इतर कामांसाठी पाचवेळा मुदतवाढ देण्यात आली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायदा १९८८ आणि केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ अंतर्गत मुदतवाढीची सूचना प्रसिद्ध केली होती. यात ३१ ऑक्टोबर, २०२०, ३१ डिसेंबर २०२०, ३१ मार्च २०२१, ३० जून २०२१ पर्यंत आणि नंतर ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. विहीत मुदतीत अनेकांची अपॉइंटमेंट राहिल्याने लायसन्स रद्द होण्याची भीती आहे.
काय होत्या अडचणी
कोरोना काळात शासकीय कार्यालयातील गर्दीवर नियंत्रण म्हणून उपस्थितीवर मर्यादा आली होती. त्यामुळे परवाना व अन्य कामांसाठी पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली.
ज्या उमेदवारांच्या शिकाऊ परवान्याची मुदत संपली आहे, त्यांच्यासाठी पक्का वाहन परवाना काढण्यासाठी ३० सप्टेंबर ही शेवटची मुदत असून कोटा संपला आहे.
तारीख मिळालेले येत नाहीत
उस्मानाबाद येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात सप्टेंबर महिन्यातील कोटा फुल्ल झालेला नाही. ज्यांना तारीख मिळाली आहे, त्यातील काहीजण वेळेवर येत नाहीत. परवाना, पासिंग, फिटनेस प्रमाणपत्र यासह अन्य कामे विहीत मुदतीत व्हावी याकरिता तारीख मिळालेल्या उमेदवारांनी वेळेवर हजर राहणे आवश्यक ठरत आहे.
रोजचा कोटा १९६
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मुदत संपलेला शिकाऊ परवाना, वाहन योग्यता प्रमाणपत्र, पासिंगसह इतर कामांसाठी दररोज सरासरी १९६ कोटा आहे. अपॉइंटमेंट घेतलेले ५० टक्के नागरिक येत नाहीत.
ऑनलाईन प्रक्रियेने मिळाला परवाना
लायसन्स नव्याने काढावे लागणार असे वाटत होते. मात्र, मागील पाच दिवसांपूर्वी उपप्रादेशिक परिहवन कार्यालयात गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ ऑनलाइन प्रक्रिया करून परवाना दिला.
संतोष माने,
३० सप्टेंबरपूर्वी लर्निंग लायसन्सची मुदत संपणार होती. त्यामुळे ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतली. मात्र, कोटा संपल्याने आता पुन्हा नव्याने लर्निंग लायसन्स काढावे लागू शकते.
अनिल चव्हाण,
उस्मानाबाद येथे मुदत संपलेले लर्निंग लायसन्सचा कोटा दोन दिवसांपूर्वी संपला आहे. मुदत वाढवूनही अनेकांनी अपॉइंटमेंट घेतली नाही. सप्टेंबर महिन्यानंतर परवान्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. त्याकरिता डॉक्टरांनाही प्रणालीवर रजिस्ट्रंशन करावे लागणार आहे.
गजानन नेरपगार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी