दुचाकीला अडकविलेली पर्स लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:30 IST2021-03-06T04:30:54+5:302021-03-06T04:30:54+5:30
उस्मानाबाद -दुचाकीला अडकविलेली पर्स अज्ञाताने लंपास केली. त्या पर्समध्ये ११ ग्रॅम साेन्याचे दागिने, चांदीचे पैंजण तसेच ५०० रुपये हाेते. ...

दुचाकीला अडकविलेली पर्स लंपास
उस्मानाबाद -दुचाकीला अडकविलेली पर्स अज्ञाताने लंपास केली. त्या पर्समध्ये ११ ग्रॅम साेन्याचे दागिने, चांदीचे पैंजण तसेच ५०० रुपये हाेते. ही घटना तुळजापूर शहरात ४ मार्चला दुपारी साडेबारा वाजता घडली.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील सरडेवाडीयेथील ज्ञानेश्वर मच्छिंद्र धुरगुडे यांनी ४ मार्चला दुपारी साडेबारा वाजता तुळजापूर शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकातील एका दुकानासमाेरम माेटारसायकल उभी करून ते खरेदीसाठी गेले हाेते. आजूबाजूला काेणीही नसल्याची संधी साधत दुचाकीला अडकविलेली पर्स अज्ञाताने लंपास केली. सदरील पर्समध्ये ११ ग्रॅम साेन्याचे दागिने, चांदीचे पैंजण तसेच राेख ५०० रूपये हाेते. पर्स चाेरीला गेल्याचे लक्षात येताच धुरगुडे यांनी तुळजापूर पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.