घनकचरा व्यवस्थापनास मुबलक निधी देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:38 IST2021-09-24T04:38:53+5:302021-09-24T04:38:53+5:30
तेर : केंद्र सरकारच्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन कामास पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही जिल्हा ...

घनकचरा व्यवस्थापनास मुबलक निधी देऊ
तेर : केंद्र सरकारच्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन कामास पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष तथा तेर गटाच्या सदस्य अर्चनाताई पाटील यांनी दिली.
गुरुवारी पदाधिकारी, आधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्या बाेलत हाेत्या. याप्रसंगी जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, तांत्रिक सल्लागार बळीराम केंद्रे, सरपंच नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच रवीराज चौगुले, ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी, पद्मकर फंड, जुनेद मोमीन, भास्कर माळी, विजयसिंह फंड, विठ्ठल लामतुरे, प्रवीण साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
माजी उपाध्यक्ष पाटील म्हणाल्या की, तेर ग्रामपंचायतीचा घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून गावात सांडपाणी तसेच घनकचऱ्याचे व्यवस्थापन केले जाणार आहे. केंद्र सरकारकडून यासाठी मुबलक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन १५ ऑक्टाेबर राेजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते केले जाणार आहे. यानंतर नृसिंह वेस येथील जि. प. कन्या शाळेच्या संरक्षित भिंतीच्या कामाचे भूमिपूजनासह भूमिगत गटार बांधकामाचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्थानिक पदाधिकारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.