आठशे गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST2021-09-22T04:36:24+5:302021-09-22T04:36:24+5:30
उस्मानाबाद : मागील पाच वर्षांपासून पर्यावरणीय प्रदूषण टाळण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणाऱ्या बेंबळी येथील ग्रामसेवा ग्रुपच्या वतीने यंदा गावातील आठशेहून ...

आठशे गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन
उस्मानाबाद : मागील पाच वर्षांपासून पर्यावरणीय प्रदूषण टाळण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणाऱ्या बेंबळी येथील ग्रामसेवा ग्रुपच्या वतीने यंदा गावातील आठशेहून अधिक गणेशमूर्तींचे संकलन करून, विधिवत विसर्जन करण्यात आले.
बेंबळी येथील ग्रामसेवा ग्रुपच्या वतीने मागील पाच वर्षांपासून वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, आरोग्य शिबिर, तसेच गणेशोत्सवात विसर्जनासाठी गावातील गणेशमूर्तींचे संकलन केले जाते. यंदा रविवारी गणेश विसर्जन दिनी गावातील मल्लिकार्जुन मंदिर येथे गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले होते. या केंद्रावर गावातील घरगुती आठशे गणेशमूर्ती व विविध गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले, तसेच विसर्जनाच्या वेळी पाणी प्रदूषण होऊ नये, यासाठी निर्माल्याचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. संकलित केलेल्या आठशेहून अधिक गणेशमूर्ती उमरेगव्हाण शिवारात असलेल्या मोठ्या खदाणीच्या जलसाठ्यात विसर्जित करण्यात आल्या.