कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST2021-07-04T04:22:11+5:302021-07-04T04:22:11+5:30
कळंब : येथील पंचायत समिती कार्यालयात कृषी दिनानिमित्त तालुक्यातील उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी पं. स.चे ...

कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा गौरव
कळंब : येथील पंचायत समिती कार्यालयात कृषी दिनानिमित्त तालुक्यातील उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी पं. स.चे उपसभापती गुणवंत पवार हे होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी जाधव, मंडल कृषी अधिकारी ढेरे, पं. स. कृषी अधिकारी व्ही. व्ही अंधारी, मंगेश चव्हाण, विस्तार अधिकारी जोगदंड, सांख्यिकी अधिकारी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी स. २०२०-२१ रबी हंगामामध्ये तालुकास्तरीय पीक स्पर्धेत निवड करण्यात आलेल्या उत्कृष्ट शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेत मोतीराम काळे, गणेश काळे व ज्ञानोबा पाटील यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. तालुकास्तरीय वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कारासाठी दिलीप टोणगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांनाही गौरविण्यात आले. प्रास्ताविक कृषी अधिकारी मंगेश चव्हाण यांनी केले. बी. बी. जाधव यांनी कृषी विभागाकडील विविध योजनांची माहिती दिली. एस. डी. ढेरे यांनी पीक स्पर्धेबाबतची माहिती देऊन शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. कृषी अधिकारी व्ही. व्ही. अंधारी यांनी आभार मानले.
कार्यक्रमानंतर उपस्थितांच्या हस्ते पं. स. च्या प्रांगणात वृक्षलागवड करण्यात आली.