गरोदर महिलेचा डेंग्यूने घेतला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:35 IST2021-09-26T04:35:48+5:302021-09-26T04:35:48+5:30
येथील आजारी यल्लाम्मा साईनाथ मुळे या गरोदर महिलेला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर रक्त चाचणीमधून त्यांना डेंग्यू असल्याचे ...

गरोदर महिलेचा डेंग्यूने घेतला बळी
येथील आजारी यल्लाम्मा साईनाथ मुळे या गरोदर महिलेला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर रक्त चाचणीमधून त्यांना डेंग्यू असल्याचे निदान झाले. महिलेची प्रकृती बिघडत चालल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात व तेथून बुधवारी लातूरला हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्यांचे पती साईनाथ मुळे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, महिलेच्या मृत्यूची माहिती मिळताच पालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून, शनिवारी सकाळी भारतनगर परिसरात फवारणी, ॲबेटिंग व साफसफाई करण्यात आली असल्याची माहिती पालिकेचे आरोग्य विभागाचे प्रमुख तुळशीराम वऱ्हाडे यांनी दिली.
कोट........
या महिला रुग्णाला डेंग्यूचे निदान झाल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयातून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना लातूर येथे रेफर करण्यात आले. शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. आम्ही संबंधित महिलेचे वास्तव्य असलेल्या भागातील नागरिकांचे रक्त नमुने घेऊन चाचणी केली आहे. शिवाय, त्या भागात ॲबेटिंग व फवारणी करण्यास सांगितले असून, पालिकेकडून कार्यवाही सुरू झाली आहे. डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक भागाचा सर्व्हे आरोग्य विभागाच्या पथकाकडून केला जात आहे.
- अशोक बडे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, उमरगा