काेविड सेंटरमधील वीज गुल, रूग्णांचे झाले हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:31 AM2021-05-14T04:31:55+5:302021-05-14T04:31:55+5:30

भूम : येथील एस. पी. काॅलेजमधील मुलांच्या वसतिगृहातील काेविड केअर सेंटरमधील वीजपुरवठा बुधवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून बंद हाेता. त्यामुळे ...

The power outage at the Kavid Center has affected the patients | काेविड सेंटरमधील वीज गुल, रूग्णांचे झाले हाल

काेविड सेंटरमधील वीज गुल, रूग्णांचे झाले हाल

googlenewsNext

भूम : येथील एस. पी. काॅलेजमधील मुलांच्या वसतिगृहातील काेविड केअर सेंटरमधील वीजपुरवठा बुधवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून बंद हाेता. त्यामुळे येथे उपचार घेत असलेल्या रूग्णांचे प्रचंड हाल झाले. दुरूस्तीची कामे आटाेपल्यानंतर सायंकाळी येथील वीजपुरवठा सुरू झाला.

भूम शहरातील एस. पी. काॅलेजमधील काेविड केअर सेंटरमध्ये जवळपास ४० रूग्ण उपचार घेत आहेत. बुधवारी सकाळी या सेंटरच्या विद्युत मीटरमध्ये बिघाड निर्माण झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. शहरातील सर्वच भागातील वीज गेली असेल, असे सुरूवातीला रूग्णांना वाटले. परंतु, सायंकाळचे ५ वाजले, तरीही वीज आलीच नाही. त्यामुळे दिवसभराच्या कडाक्याच्या उन्हाने लाेक घामाघूम झाले हाेते. अखेर मीटरमधील बिघाड दुरूस्त केल्यानंतर सायंकाळी उशिरा वीजपुरवठा सुरू झाला. एवढे माेठे काेविड केअर सेंटर असतानाही वीज गेल्यानंतर पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. याठिकाणी किमान जनरेटरची सुविधा तरी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. या प्रश्नाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज अनेक रूग्णांकडून व्यक्त करण्यात आली.

चाैकट...

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे वीज नसेल तर व्यक्ती एक मिनीटही घरामध्ये थांबू शकत नाही. काेविड केअर सेंटरमधील वीज खंडित झाल्यानंतरही येथील रूग्णांची यापेक्षा काही वेगळी स्थिती झाली नाही. उकाड्यामुळे आतील रूग्ण बाहेर येऊन थांबत हाेते. रूग्ण बाहेर का येताहेत, असा प्रश्न पडल्यानंतर काही हाेमगार्डनी त्यांच्याकडे विचारणा केली असता, वीज बंद असल्याचे सांगण्यात आले. यानंतर हा प्रकार समाेर आला.

Web Title: The power outage at the Kavid Center has affected the patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.