जळकाेटमध्ये बहुजन महाविकास आघाडीची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:32 IST2021-02-10T04:32:57+5:302021-02-10T04:32:57+5:30
सरपंचपदी अशाेक पाटील, तर श्रीदेवी कवठे उपसरपंच जळकोट : तुळजापूर तालुक्यातील जळकोट ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अशोक पाटील यांची, तर उपसरपंचपदी ...

जळकाेटमध्ये बहुजन महाविकास आघाडीची सत्ता
सरपंचपदी अशाेक पाटील, तर श्रीदेवी कवठे उपसरपंच
जळकोट : तुळजापूर तालुक्यातील जळकोट ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अशोक पाटील यांची, तर उपसरपंचपदी श्रीदेवी कवठे यांची बिनविरोध निवड झाली.
जळकोट ग्रामपंचायत मागील वीस वर्षांपासून विरोधकांच्या ताब्यात होती. दरम्यान, अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली बहुजन महाविकास आघाडीने सतरापैकी अकरा जागांवर निर्विवाद विजय मिळवून वीस वर्षांपासून असलेली सत्ता काबीज केली. सरपंचपदासाठी अशोकराव पुंडलिकराव पाटील व उपसरपंचपदासाठी श्रीदेवी बसवराज कवठे यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अभंग गायकवाड यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. निवड घोषित होताच कार्यकर्त्यांनी आतषबाजी करून जल्लोष केला. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, प्रशांत नवगिरे, शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णात मोरे, प्रा. गजेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष महेश कदम, हसुरे, सामाजिक कार्यकर्ते सतीश सोनटक्के, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यशवंत पाटील, सोसायटीचे चेअरमन राजू पाटील, शंकर वाडीकर, बसवराज भोंगे, अंकुश लोखंडे, तलाठी तात्याराव रुपनर, ग्रामसेवक ए.एस. कोकाटे यांच्यासह नूतन सदस्य उपस्थित होते.