पूल खचल्याने वाढला अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:38 IST2021-09-15T04:38:17+5:302021-09-15T04:38:17+5:30
वाशी तालुक्यातील डोंगरेवाडीपासून अर्धा किमी अंतरावर असलेला पूल गतवर्षी पावसाळ्यात वाहून गेला होता तसेच पुलानजीकचा रस्ताही खचला होता तेव्हापासून ...

पूल खचल्याने वाढला अपघाताचा धोका
वाशी तालुक्यातील डोंगरेवाडीपासून अर्धा किमी अंतरावर असलेला पूल गतवर्षी पावसाळ्यात वाहून गेला होता तसेच पुलानजीकचा रस्ताही खचला होता तेव्हापासून हा पूल व दुसरा पूल धोकादायक बनला आहे़ यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या पुलासह रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. या भागातील नागरिकांसह वाहनचालकांनी या पुलाची व रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे़
दरम्यान, चालू वर्षात झालेल्या पावसामुळे व वांजरा नदीला आलेल्या पुरामुळे पुलाच्या लगतचा भराव खचून रस्त्यावर खड्डे पडले आहेत़ त्यामुळे या भागातून ये-जा करणाºया वाहनचालकासह नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे़
कोट.........
कोरोना महामारीमुळे रस्त्यासह इतर कामे देखील बंद होती. मात्र, सध्या रस्त्याच्या व इतर कामास सुरुवात झाली असून, येत्या काही दिवसांत या ठिकाणचा पूल व रस्त्याची दुरूस्ती केली जाणार आहे.
- सतीश वायकर, अभियंता, सा. बां. विभाग