शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिका दादागिरी करतोय...', डोनाल्ड ट्रम्प यांच्या 50% शुल्काच्या धमकीवर चीन संतापला
2
२ दिवसात २२ कोटी जमा करा, अन्यथा जप्तीची कारवाई; महापालिकेची दीनानाथ रुग्णालयाला नोटीस
3
"कोई... मिल गया.." युवा प्रियांशच्या शतकी खेळीवर प्रीती झिंटाही झाली फिदा (VIDEO)
4
“...तर आम्ही स्वागतच करू”; खुलताबाद नामांतरावर अबू आझमी यांनी स्पष्ट केली भूमिका
5
Priyansh Arya Maiden IPL Century : प्रियांश आर्यची कमाल; सर्वात जलद शतक ठोकणारा दुसरा भारतीय
6
साबरमती आश्रमात पी चिदंबरम बेशुद्ध पडले; तातडीने हॉस्पिटलला हलविले
7
आम्ही दलित, मुस्लिम, ब्राह्मण मुद्द्यांमध्ये अडकलो, ओबीसी आम्हाला सोडून गेले; काँग्रेस अधिवेशनात राहुल गांधीचे वक्तव्य
8
मोठी बातमी! आजपासून संपूर्ण देशात वक्फ कायदा लागू झाला; केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली
9
संजय राऊतांनी दिली उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा; म्हणाले, “महाभारतातील तीन पात्रे...”
10
'आमची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नका', वक्फ कायद्यासाठी केंद्राची सर्वोच्च न्यायालयात धाव
11
10 हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेले डायर वुल्फ पृथ्वीवर परतले; शास्त्रज्ञांनी केला चमत्कार...
12
वक्फ विधेयकाविरोधात आंदोलनावेळी हिंसाचार; दगडफेक, जाळपोळ, पोलिसांच्या गाड्याही जाळल्या...
13
जोरदार...! चीन 1, अमेरिका 2, भारत 3...! या यादीत झाला मोठा बदल, भारतानं जर्मनीला मागे टाकलं 
14
धक्कादायक बातमी! शिर्डीत पकडलेल्या भिक्षेकर्‍यापैकी चौघांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू, कुणाचा हलगर्जीपणा?
15
“मुंबईत मराठी आले पाहिजे हे ठीक, पण आम्ही राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत नाही”: रामदास आठवले
16
"बाबर आझम रात्री उशिरा हॉटेलमधून बाहेर पडायचा अन्..."; मुलाखतीत समोर आली मोठी माहिती
17
ठाणे हादरलं! १० वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन बाथरूमच्या खिडकीतून खाली फेकलं
18
पेन्शनरांची बल्ले बल्ले! थोडा जरी विलंब झाला तरी त्यावर बँका ८ टक्के व्याज देणार, RBI चा नवा नियम
19
भाजपाचं 'ऑपरेशन कमळ'! रातोरात बैठक अन् राम शिंदेंनी रोहित पवारांना दिला मोठा धक्का
20
“...तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाचे पंतप्रधान झाले असते”: रामदास आठवले

तुळजापूर ड्रग्स प्रकरणाचे पॉलिटिकल कनेक्शन, भाजपचे माजी नगराध्यक्ष-उपसभापती गोत्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:56 IST

तुळजापूर येथील ड्रग्स प्रकरणाची पाळेमुळे चांगलीच घट्ट रुजल्याचे आता तपासातून समोर येऊ लागले आहे.

तामलवाडी (जि. धाराशिव) : तुळजापूर येथील ड्रग्स तस्करांची व यात गुंतलेल्यांची यादी लांबतच चालली आहे. मंगळवारी पोलिसांनी न्यायालयात आणखी सहा जणांची नावे उघड केली आहेत. यामध्ये तुळजापूरचे एक माजी नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष पती व पंचायत समितीच्या एका माजी उपसभापतीचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, हे पदाधिकारी भाजपशी संबंधित आहेत.

तुळजापूर येथील ड्रग्स प्रकरणाची पाळेमुळे चांगलीच घट्ट रुजल्याचे आता तपासातून समोर येऊ लागले आहे. विशेष म्हणजे यात राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीही यात गुंतल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपाधीक्षक निलेश देशमुख तसेच तपास अधिकारी गोकूळ ठाकूर यांनी तपासाला गती देत आतापर्यंत १९ आरोपी निष्पन्न केले होते. त्यात मंगळवारी पुन्हा ६ नवीन नावांची भर पडली आहे. या प्रकरणात तीन वेळा ड्रग्स पकडण्यात आले असून, सोमवारी रात्री उशिरा पकडलेल्या सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा राहूल कदम-परमेश्वरसह १३ आरोपी कोठडीत आहेत. वैभव गोळे व स्वराज उर्फ पिनू तेलंग हे दोघे फरार आहेत. दरम्यान, पोलिसांनी मंगळवारी या यादीत आणखी काही नावे उघड करुन त्यांचा शोध सुरु असल्याचे सांगितले आहे. या नव्या यादीत तीन बड्या राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

...यांना करण्यात आले आरोपीमंगळवारी पोलिसांनी न्यायालयासमोर उघड केलेल्या आरोपींच्या नावात माजी नगराध्यक्ष पती विनोद उर्फ पिटू गंगणे, चंद्रकांत (बापू) कणे, माजी उपसभापती शरद जमदाडे यांच्यासह इंद्रजीतसिंग ठाकूर, प्रसाद उर्फ गोठन कदम, उदय शेटे, गजानन प्रदीप हंगरकर, आबासाहेब पवार, आलोक शिंदे, अभिजीत गव्हाड असे १० व यापूर्वीचे दोन असे एकूण १२ आरोपी सध्या फरार आहेत.

असे आहे पॉलिटिकल कनेक्शनसध्या कोठडीत असलेला आरोपी विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे हा भाजपच्या माजी सभापतींचा मुलगा आहे. तर माजी नगराध्यक्ष पती विनोद गंगणे, माजी उपसभापती शरद जमदाडे हे हेही भाजपशी संबंधित आहेत. माजी नगराध्यक्ष बापू कणे हे दोन-तीन वर्षांपूर्वीपर्यंत भाजपसोबत सक्रीय होते. विशेष म्हणजे, हे राजकीय पदाधिकारी यापूर्वी काँग्रेस व अविभक्त राष्ट्रवादीकडून निवडून आलेले होते. नजीकच्या काळात त्यांनी भाजपात उडी घेतली होती.

टॅग्स :Drugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारीdharashivधाराशिव