शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

उमरग्यात मांस वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 5:53 PM

या प्रकरणी पाच जणांविरूध्द उमरगा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.

उमरगा (उस्मानाबाद ) : मांस वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक टमटमसह एका टेम्पोवर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई केली़ ही कारवाई रविवारी रात्री उमरगा तालुक्यातील नारंगवाडी पाटी जवळ करण्यात आली़ यावेळी चार टन मांसासह नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ या प्रकरणी पाच जणांविरूध्द उमरगा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.

परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या विशेष पथकाने रविवारी रात्री नारंगवाडी पाटीवर नाकाबंदी केली होती़ यावेळी राबविलेल्या तपासणी मोहिमेत उस्मानाबाद येथून लोहारा मार्गे येणाऱ्या मालवाहतूक टमटम (क्र.एम एच २५- पी ५५२५) व टेम्पोची (क्र. एम एच २५- पी ३१८५) तपासणी केली़ त्यावेळी दोन्ही वाहनात मांस असल्याचे निदर्शनास आले़ पोलिसांनी दोन्ही चालकासह वाहने ताब्यात घेऊन उमरगा पोलीस ठाणे गाठले़ तेथे पाहणी केली असता दोन्ही वाहनात प्रत्येकी दोन टन प्रमाणे चार लाख रूपये किंमतीचे चार टन मांस आढळून आले़.

पोलिसांनी चार लाखाचे मांस व पाच लाखाची दोन्ही वाहने असा एकूण नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त केला़ दोन्ही चालकांकडे कसून चौकशी केली असता हे मांस उस्मानाबाद येथून हैद्राबादला घेऊन जात असल्याचे समोर आले़ या प्रकरणी पोहेकॉ किरण कोळेकर यांच्या फिर्यादीवरून चालक मजहर सत्तार कुरेशी, दुसरा चालक रमजान अब्दुल सय्यद, शहाबाज शिकुर कुरेशी, मुस्तफा जाफर कुरेशी, आखलाख खैरुद्दीन कुरेशी (सर्व रा.उस्मानाबाद) यांच्या विरूध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५ (अ क) ९ (अ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही चालकांना अटक करण्यात आले आहे़ तपास तपास पोउपनि सुभाष माने हे करीत आहेत. जप्त केलेल्या मांसाची  पालिकेमार्फत विल्हेवाट लावण्यात आली़

टॅग्स :Usmanabad policeउस्मानाबाद पोलीसArrestअटकOsmanabadउस्मानाबाद