पोलिसांचे पथसंचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:43 IST2021-01-08T05:43:57+5:302021-01-08T05:43:57+5:30
सोहळ्याची सांगता उस्मानाबाद : तालुक्यातील गोवर्धनवाडी येथे सद्गुरु भगवानगिरीबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित समाधी सोहळ्याची सांगता मोक्षधाम मठाण नारायण महाराज ...

पोलिसांचे पथसंचलन
सोहळ्याची सांगता
उस्मानाबाद : तालुक्यातील गोवर्धनवाडी येथे सद्गुरु भगवानगिरीबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित समाधी सोहळ्याची सांगता मोक्षधाम मठाण नारायण महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. यानिमित्त सोमवारी सकाळी समाधीस महाभिषेक करण्यात आले. त्यानंतर नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्री यांचे काल्याचे किर्तन झाले. किर्तनानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. यावेळी गोवर्धनवाडीसह परिसरातील गावातून भाविक उपस्थित होते.
मुकनाट्य सादर
उस्मानाबाद : येथील श्री स्वामी विवेकाननद शिक्षण संस्थेच्या अध्यापक विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थिनीननी हुंडा बळीवर मुकनाट्य सादर केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. एच. पवार होते. यावेळी यु. पी. झाल्टे, प्रा. शिंदे, प्रा. एस. पी. पोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती. या मुकनाट्यात मानसी शिंदे, स्वप्ना ठाकूर, अंकिता गरड, आकांक्षा लोंढे, अपर्णा झाडके, प्रसाद पांगरे यांनी सहभाग घेतला.