रस्त्यावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:30 AM2021-03-06T04:30:43+5:302021-03-06T04:30:43+5:30

ज्वारीच्या काढणीला वेग उस्मानाबाद -सुरुवातीच्या टप्प्यात पेरणी झालेल्या ज्वारीचे पीक सध्या काढणीला आले आहे. शेतकरी ज्वारी काढण्यात व्यस्त आहेत. ...

Pits on the road | रस्त्यावर खड्डेच खड्डे

रस्त्यावर खड्डेच खड्डे

googlenewsNext

ज्वारीच्या काढणीला वेग

उस्मानाबाद -सुरुवातीच्या टप्प्यात पेरणी झालेल्या ज्वारीचे पीक सध्या काढणीला आले आहे. शेतकरी ज्वारी काढण्यात व्यस्त आहेत. मध्यंतरी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिकाला फटका बसला आहे. ज्वारी आडवी झाल्याने कणसे काळी पडली आहेत. त्यामुळे उत्पादनात घट येणार आहे.

प्रवाशांची गैरसाेय

भूम - येथील स्थानकात प्रचंड खड्डे पडले आहेत. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. हे खड्डे बुजविण्याची मागणी मागील काही महिन्यांपासून हाेत आहे. परंतु, या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे प्रवाशांतून नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे.

कार्यालयांची रंगरंगाेटी

उस्मानाबाद - ‘सुंदर माझे कार्यालय’ या माेहिमेअंतर्गत जिल्हा परिषद इमारतीतील सर्वच कार्यालयांची रंगरंगाेटी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दालनाचे रूपडे पालटले आहे. ही सर्व रंगरंगाेटी कर्मचाऱ्यांच्या मदतीतून करण्यात आली आहे.

Web Title: Pits on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.