औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:10 IST2021-09-02T05:10:36+5:302021-09-02T05:10:36+5:30

फाेटाे आहे... वाशी - रस्ते प्राधिकरणाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या साेलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. ...

Pits on Aurangabad-Solapur Highway | औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर खड्डे

औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर खड्डे

फाेटाे आहे...

वाशी - रस्ते प्राधिकरणाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या साेलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाती घटनांचा धाेका बळावला आहे. अल्पावधीच खड्डे पडल्याने रस्त्याच्या गुणवत्तेच्या अनुषंगाने चाैकशीची मागणी जाेर धरू लागली आहे.

वाहतूक सुलभ व्हावी या उद्देशाने केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने राज्यात अनेक भागात चौपदरी रस्ते निर्माण करण्यात आले आहेत़ वाशी तालुक्यातून धुळे-सोलापूर हा चौपदरी रस्ता जाताे. हा रस्ता उभारत असताना शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, अल्पावधीतच या महामार्गावर खड्डे पडण्यास सुरूवात झाली आहे. सरमकुंडी फाटा ते वाशी फाटा या दरम्यान असलेल्या पेट्रोल पंपाजवळ रस्ता खचला आहे़ वाहनधारकांतून तक्रारी झाल्यांनतर आयआरबी कंपनीकडून डागडुजी करण्यात आली. परंतु, काही दिवसांतच जैसे थे स्थिती निर्माण झाली. उस्मानाबादकडे जातानाही अनेक ठिकाणी रस्ता खचल्याचे पहावयास मिळते. ज्या ठिकाणी चढ निर्माण झाला आहे, ताे भाग यंत्राच्या साहाय्याने खरडून घेतला असला तरी वाहनधारकांना गैरसाेयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तात्पुरती मलमपट्टी न करता, कायमस्वरूपी डागडुजी करण्याची मागणी हाेत आहे. महामार्गावरील हे खड्डे खासकरून रात्रीच्या वेळी दिसून येत नाहीत. त्यामुळे भरधाव वेगातील वाहने अशा खड्ड्यांत आदळून नुकसान हाेत आहे. त्यामुळे टाेल वसुलीत कसर न साेडणाऱ्या कंपनीने डागडुजीची कामेही विनाविलंब करावीत, अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे.

चाैकट...

वाशी तालुक्यातून गेलेल्या महामार्गावरील वाशी फाटा व सरमकुंडी फाटा येथे उड्डाणपुलाची उभारणी केलेली नाही. त्यामुळे या परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. सरमकुंडी फाट्यावर भूमकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी गेल्या सात ते आठ महिन्यात चार अपघात होऊन चौघांना प्राणास मुकावे लागले आहे़ अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता, उपाययाेजना करण्याची गरज आहे. संबंधित यंत्रणेस वारंवार निवेदने देऊनही काहीच फायदा झाला नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.

Web Title: Pits on Aurangabad-Solapur Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.