पीडित शेतकऱ्याने मागितली जुगार अड्ड्याची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:37 IST2021-09-15T04:37:50+5:302021-09-15T04:37:50+5:30
उमरगा : राशीला आलेल्या सोयाबीनला पावसात मोड फुटल्याने चार लाखांचे सोयाबीन वाया गेले; परंतु शासन, प्रशासन काहीच दखल न ...

पीडित शेतकऱ्याने मागितली जुगार अड्ड्याची परवानगी
उमरगा : राशीला आलेल्या सोयाबीनला पावसात मोड फुटल्याने चार लाखांचे सोयाबीन वाया गेले; परंतु शासन, प्रशासन काहीच दखल न घेत नाहीत, पंचनामाही झाला नाही. अशा स्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी व कर्ज फेडण्यासाठी ‘गुडगुडी सट्टा’ हा जुगार व्यवसाय चालविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी तालुक्यातील कोळसूर येथील पीडित शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अल्पभूधारक अशोक ढगे या युवा शेतकऱ्याने कर्ज काढून पावसाच्या उघडीप काळात सोयाबीन सिंचन केले होते. अघोटी पेरणी करूनही पीक समाधानकारक होते. सद्य:स्थितीत सोयाबीन भाव पाहता अपेक्षित उत्पन्न ४ ते ५ लाख होते; परंतु अचानक अतिवृष्टीमुळे संपूर्ण सोयाबीन वाया गेले. याला आता १५ दिवस उलटून गेले. सध्या खाजगी सावकार पैशासाठी तगादा लावत आहेत. त्यामुळे शासनाला या नुकसानीची भरपाई देणे शक्य नसेल तर किमान ‘गुडगुडी सट्टा’ चालविण्याची परवानगी द्यावी. विशेष म्हणजे, एक वर्ष हा व्यवसाय करून सर्व कर्जाची परतफेड झाल्यानंतर मी हा व्यवसाय बंद करून पुन्हा शेती व्यवसायाकडे वळेन, अशी ग्वाहीही त्यांनी या निवेदनात दिली आहे.