गुढ आवाजाने परंडा तालुका हादरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 16:48 IST2018-09-14T16:45:20+5:302018-09-14T16:48:49+5:30
शहरासह तालुक्याच्या काही भागात आज दुपारी गूढ आवाज झाला.

गुढ आवाजाने परंडा तालुका हादरला
परंडा (उस्मानाबाद) : शहरासह तालुक्याच्या काही भागात आज दुपारी गूढ आवाज झाला़ दुपारी २.४३ मिनिटाच्या सुमारास दोन मोठे आवाज झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़
उस्मानाबाद जिल्ह्यात मागील काही वर्षापासून सतत गूढ आवाज होण्याचे प्रकार घडत आहेत़ दोन दिवसांपूर्वी कळंब तालुक्यातील इटकूर परिसरातही मोठा गूढ आवाज झाला होता़ परंडा शहरासह तालुक्याच्या काही भागात शुक्रवारी दुपारी २.४३ मिनिटाच्या सुमारास अचानक दोन मोठे आवाज झाले़ आवाजाची तिव्रता इतकी मोठी की काही ठिकाणी घरातील भांडी जमीनीवर पडली़ त्यामुळे भयभित झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर येऊन भूकंपाची चर्चा सुरू केली.
परंडा शहरासह कात्राबाद, देवगाव, वडणेर, सोनगीरी, रूई, कात्राबाद, जामगाव या आसपासच्या गावात मोठा आवाज झाला़ आवाजाची तीव्रता अधिक असल्याने सर्वसामान्यांच्या मनात भिती निर्माण झाली असून, भूकंपाची चर्चाही रंगली आहे़ याबाबत तहसीलदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही़.