पेन्शन हक्क संघटनेने घेतली आमदारांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:30 IST2021-03-28T04:30:30+5:302021-03-28T04:30:30+5:30
कळंब : प्रलंबित वेतन श्रेणी प्रस्ताव,मागील हिशोब न देता एनपीएस फॉर्म भरून घेणे आदी प्रश्नांची सोडवण्यासाठी जुनी पेन्शन हक्क ...

पेन्शन हक्क संघटनेने घेतली आमदारांची भेट
कळंब : प्रलंबित वेतन श्रेणी प्रस्ताव,मागील हिशोब न देता एनपीएस फॉर्म भरून घेणे आदी प्रश्नांची सोडवण्यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या कळंब तालुका शाखेच्या शिष्टमंडळाने आ. कैलास पाटील यांची भेट घेतली. यावेळी आ. पाटील यांनी मुद्देनिहाय संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले.
यावेळी वरिष्ठ वेतन श्रेणीचे अनेक कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. खासगी संस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मागील हिशोब न देताच एनपीएस फॉर्म भरून घेतले जातात. सानुग्रह अनुदानाचे प्रलंबित प्रकरणे आदी याविषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे कळंब तालुकाध्यक्ष नारायण बाकले, कार्याध्यक्ष सुनील बोरकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रशांत घुटे, सुधाकर सुरवसे, दत्तात्रय जाधवर यांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदनही देण्यात आले.
चौकट...
कार्यवाहीच्या दिल्या सूचना
जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रलंबित वेतन श्रेणीचा विषय मांडल्यावर आ. कैलास पाटील यांनी तत्काळ शिक्षणाधिकारी मोहरे यांच्याशी संवाद साधत कार्यवाही करण्याची सूचना केली. याशिवाय एनपीएस संदर्भात वेतन अधीक्षक उस्मानाबाद, शिक्षण संचालक कार्यालय पुणे यांच्याशी बोलून संघटनेच्या मागण्यांकडे लक्ष वेधले. सानुग्रह अनुदानाच्या मंत्रालय स्तरावरील प्रकरणात मुंबईला गेल्यावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन आ. पाटील यांनी दिले.