अल्लमप्रभू देवस्थानासमाेर साकारणार उद्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:24+5:302021-06-18T04:23:24+5:30
भूम : शहरातील अल्लमप्रभू देवस्थान येथे पालिकेच्या पुढाकारातून सुसज्ज उद्यान उभारण्यात येणार आहे. यावर सुमारे २५ लाख रुपये खर्च ...

अल्लमप्रभू देवस्थानासमाेर साकारणार उद्यान
भूम : शहरातील अल्लमप्रभू देवस्थान येथे पालिकेच्या पुढाकारातून सुसज्ज उद्यान उभारण्यात येणार आहे. यावर सुमारे २५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामाचे भूमिपूजन नगरपालिकेतील गटनेते संजय गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले.
दत्तजयंतीनिमित्त अल्लमप्रभू देवस्थानची प्रत्येक वर्षी भव्य यात्रा भरते. हा यात्राैत्सव तीन दिवस चालताे. यात्रेच्या या काळात भाविक दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करतात. दर्शन झाल्यानंतर येथे आलेल्या नागरिकांना मंदिराच्या परिसरात विसावा घेण्यासाठीची उपलब्ध जागा कमी पडत आहे. त्यामुळे भाविकांना गैरसाेयीला ताेंड द्यावे लागत हाेते. सदरील प्रश्न साेडविण्याच्या अनुषंगाने भाविकांकडून पालिका गटनेते संजय गाढवे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला जात हाेता. दरम्यान, भाविकांची हाेणारी गैरसाेय लक्षात घेऊन थाेडाही विलंब न लावता गटनेते गाढवे यांनी पालिकेकडून सुमारे २५ लाख रुपयांची तरतूद उपलब्ध करून घेत उद्यानाचे काम मंजूर केले. सदरील उद्यानाचे काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या साैंदर्यात भर पडेल. तसेच भाविकांची गैरसाेयही दूर हाेईल. उद्यानाच्या कामाचे भूमिपूजन गटनेते संजय गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा संयोगिता गाढवे, नगरसेविका सारिका थोरात, मेहराज बेगम सय्यद, पालिका अभियंता गणेश जगदाळे, राम बागडे, सुनील थोरात, सुनील माळी, देवस्थान ट्रस्टचे दिलीप शाळू, हरी पवार, आदी उपस्थित हाेते.
काेट...
मंदिराच्या परिसरात विसाव्यासाठी उद्यान उभारावे अशी मागणी हाेती. भाविकांची हाेणारी गैरसाेय लक्षात घेऊन पालिकेच्या माध्यमातून तातडीने २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले. आता कामाचा प्रारंभही झाला आहे. चार महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येईल.
- संजय गाढवे, गटनेते, नगरपरिषद, भूम.