शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

VIDEO: हसता हसता मृत्यूनं गाठलं; निरोपाचे भाषण देत असतानाच सर्वांसमोर वर्षाने सोडले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 15:59 IST

धाराशिवमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा भाषण देत असताना दुर्दैवी मृत्यू झाला.

गेल्या काही महिन्यांपासून आकस्मित मृत्यंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. व्यायाम करताना, शाळेत, चालताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन अनेकांचा जीव गेल्याच्या घटना समोर आहेत. अशातच धाराशिवच्या परांडा तालुक्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. परांडा येथील एका कॉलेजमध्ये निरोप समारंभाचे भाषण देत असतानाच एका विद्यार्थिनीला मृत्यूने गाठलं. भाषण संपवत असताना विद्यार्थिनी खाली कोसळली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला. विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांसह कॉलेजवर शोककळा पसरली आहे.

निरोप समारंभात भाषण करताना चक्कर येऊन पडल्यानंतर विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना परंडा शहरातील रा. गे. शिंदे महाविद्यालयात घडली. २० वर्षीय वर्षा खरात असं या विद्यार्थिनीचे नाव आहे. बीएससीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ सुरु असताना वर्षा भाषण करत होती. मात्र ती अचानक खाली कोसळल्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. सर्वांनी वर्षाकडे धाव घेतली आणि तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासून वर्षाला मृत घोषित केले. वर्षाच्या मृत्यूची बातमी कळताच सर्वत्र शोककळा पसरली. काही मिनिटांपूर्वी भाषण देत असलेली वर्षा आपल्यातून निघून गेल्याचे अनेकांना खरं वाटत नव्हतं.

या घटनेमुळे महाविद्यालय प्रशासन आणि विद्यार्थ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वर्षा भाषण करत असतानाच हा प्रकार घडला. त्यावेळी तिचे भाषण कोणीतरी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होते. तो व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात वर्षा खाली कोसळताना दिसत आहे. दरम्यान, वर्षाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाढलेल्या उन्हामुळे तिला भोवळ आल्याने हे घडल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. तर काहींच्या मते वर्षाला हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र डॉक्टरांकडून  वर्षाच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

भाषणात काय म्हणत होती वर्षा?

वर्षाने भाषणात बोलताना, प्रत्येक जण आपापल्या परीने जेवढा जमेल तेवढा अभ्यास करत असतो... असं म्हणताच सर्व विद्यार्थी हसू लागले. त्यानंतर वर्षा तिच्या शिक्षकांविषयी सांगू लागली. मात्र तितक्यातच खाली कोसळली. 

टॅग्स :dharashivधाराशिवSocial Viralसोशल व्हायरल