शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

उस्मानाबाद जिल्ह्यात कुष्ठरूग्णांच्या संख्येत दहा टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 18:31 IST

कुष्ठरोग शोध मोहिमेत मागील पाच वर्षात आढळून येणाऱ्या रूग्णसंख्येत तब्बल दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे़

- विजय मुंडेउस्मानाबाद : जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कुष्ठरोग शोध मोहिमेत मागील पाच वर्षात आढळून येणाऱ्या रूग्णसंख्येत तब्बल दहाटक्क्यांनी वाढ झाली आहे़ यातील ५७ जणांवर शासकीय योजनेतून मिरज येथे शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत़ तर औषधोपचारामुळे कुष्ठरोग कमीहोण्याचे प्रमाण ९८ टक्क्यांवर गेले आहे़.

जिल्ह्यातील कुष्ठरोगाची लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांची प्रशासनाकडून प्रत्येक वर्षी मोहीम राबवून तपासणी केली जाते़ यंदाची तपासणी मोहीम २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर या कालावधीत होत आहे़ कुष्ठरोगाचे निर्मुलन व्हावे, यासाठी शासनस्तरावरून अनेक योजना राबविण्यात येत आहे़जिल्ह्यातील आकडेवारी पाहता मागील पाच वर्षात प्रत्येक वर्षी रूग्ण कुष्ठरूग्ण आढळून येण्याची संख्या वाढताना दिसत आहे़ सन २०१३-१४ मध्येजिल्ह्यात १४६ रूग्ण आढळून आले होते़ तर २०१४-१५ मध्ये १५३, २०१५-१६ मध्ये १७६, २०१६-१७ मध्ये २०१ तर २०१७-१८ मध्ये ३१९ कुष्ठरूग्ण आढळून आले आहेत

रूग्णांचे प्रमाण पाहता २०१३-१४ मध्ये ८़४१ टक्के, २०१४-१५ मध्ये ८़६९ टक्के, २०१५-१६ मध्ये ९़८४ टक्के, २०१६-१७ मध्ये ११़२४ टक्के तर २०१७-१८ मध्ये रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण १७़८४ टक्क्यांवर गेले आहे़ कुष्ठरूग्णांना कुष्ठरोग विभागाकडून विविध साहित्याचे वाटप केले जाते़ मागील पाच वर्षात रूग्णांना जखमा होऊ नयेत म्हणून वापरावयाच्या १९२१ चपलांचे वाटप करण्यात आले आहे़ तसेच १०२ चष्मे, रूग्णांनी स्वत: उपचारघ्यावेत यासाठी १३९ किटचे वाटप करण्यात आले आहे़ चालू वर्षात प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत किती रूग्ण आढळून येतात? याकडेलक्ष लागले आहे़

औषधोपचाराने आजार होतो दूरअंगावरील न खाजविणारे, न दुखणारे चट्टे असतील तर डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे गरजेचे आहे़ अशा नागरिकांना कुष्ठरोग असू शकतो़ चार पेक्षा कमी चट्टे असतील तर सहा महिने व चार पेक्षा जास्त चट्टे असतील तर एक वर्षभर औषधोपचार केले तर कुष्ठरोग दूर होतो़ नागरिकांनी न लाजता, चट्टे न लपविता ते डॉक्टरांना दाखवून उपचार घ्यावेत़- डॉ़ बी़एसख़डके, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग)

तर होऊ शकते लागणकुष्ठरोग असलेल्या आणि ज्या रूग्णाने औषधोपचार घेतलेले नाहीत, अशा रूग्णाचा अधिक काळ संपर्क आला तर कुष्ठरोगाची लागण होऊ शकते़रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेल्या नागरिकांना याची लागण होण्याची शक्यता अधिक असते़ कुष्ठरोगाच्या जंतुंनी शरिरात प्रवेश केला तर तीन ते पाच वर्षात शरिरावर कुठेही कुष्ठरोगाची लक्षणे दिसतात़ नवीन रूग्णांपैकी केवळ १० ते १५ रूग्ण सांसर्गिक (रोग पसरविणारे) असतात़ औषधोपचार घेणाऱ्या रूग्णांमुळे रोगाचा संसर्ग होण्याचे प्रमाण शून्य आहे़

कुष्ठरोगाची लक्षणेत्वचा तेलकट, लालसर, जाडसर, सुजलेली दिसणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, सुजणे, भुवयांचे केस विरळ होणे, झडणे, अंगावर गाठी येणे, अंगावरील विविध ठिकाणी दिसणारे चट्टे ही कुष्ठरोगाची लक्षणे आहेत.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय