शंभूराजे महानाट्यात स्थानिक कलाकारांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:32 IST2021-02-10T04:32:52+5:302021-02-10T04:32:52+5:30
मागील ३१ वर्षांपासून शिवजयंतीचे औचित्य साधून मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विविध समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा इतर ...

शंभूराजे महानाट्यात स्थानिक कलाकारांना संधी
मागील ३१ वर्षांपासून शिवजयंतीचे औचित्य साधून मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विविध समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा इतर कार्यक्रमांबरोबरच प्रा.नितीन बानगुडे-पाटील लिखित आशिया खंडातील सर्वात मोठे नाटक, अशी ख्याती असलेल्या ‘शंभूराजे’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. उस्मानाबाद शहरात २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान सलग तीन दिवस या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत. यात आठ ते १३ वर्षेे वयोगटांपासून ३० ते ५० वर्षे वयोगटांतील कलाकारांना सहभागी होता येणार आहे. उस्मानाबाद शहर व ग्रामीण भागातील कलाकारांना भव्यदिव्य रंगमंचावर काम करण्याची सुवर्णसंधी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी इच्छुक कलाकारांनी अभिजीत देडे, प्रा.मनोज डोलारे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आशिष मोदाणी यांनी केले आहे.