कारच्या धडकेत एक ठार; चौघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:32 IST2021-04-10T04:32:19+5:302021-04-10T04:32:19+5:30

(फोटो : नूर शेख ०९) कसबे तडवळे : उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथून जाणाऱ्या लातूर-बार्शी महामार्गावर ट्रक- कारच्या धडकेत ...

One killed in car crash; Four injured | कारच्या धडकेत एक ठार; चौघे जखमी

कारच्या धडकेत एक ठार; चौघे जखमी

(फोटो : नूर शेख ०९)

कसबे तडवळे : उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथून जाणाऱ्या लातूर-बार्शी महामार्गावर ट्रक- कारच्या धडकेत एक जण ठार तर चार जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनल्याच्या प्रतिक्रिया वाहनधारकांमधून व्यक्त होत आहेत.

लातूर-बार्शी महामार्गावरील तडवळा ते येडशी दरम्यान जवळा पाटीजवळ लातूरहून पुण्याकडे जाणाऱ्या कार (क्रमांक एमएच ०९/ एक्यू ४१११) व पुण्यावरून गॅस सिलिंडर घेऊन भादाकडे जाणाऱ्या ट्रक (क्रमांक एमएच ४८/टी ५१८०) यांची समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला. अपघातात कारमधील गफूर इरादी बागवान (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अकबर गफूर बागवान (वय २३), सलीम मैनुद्दीन बागवान (वय ३६), शहजादी गफूर बागवान (वय ४६), अफरोज गफूर बागवान (वय ३०) (सर्व रा.अन्सर नगर, लातूर) हे गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती कळताच, हायवे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालकाने आपला ट्रक घेऊन लातूरच्या दिशेने पोबारा होण्याचा प्रयत्न केला. मात्र, ढोकी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ट्रक अडवून ट्रक चालकास ताब्यात घेतले. घटनेचा पंचनामा तडवळा पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार गजेंद्र गुंजकर, पोकॉ श्याम छत्रे यांनी घटनेचा पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती.

Web Title: One killed in car crash; Four injured