शहरी भागातील नवजात बालकांत वाढला लठ्ठपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:28 AM2021-03-07T04:28:55+5:302021-03-07T04:28:55+5:30

उस्मानाबाद : बदलती जीवनशैली व फास्टफूडच्या अधिक सेवनामुळे अनेक महिला-पुरुष लठ्ठपणाचा शिकार होत आहेत. आता आई-वडील लठ्ठ असलेल्यांची नवजात ...

Obesity increased in newborns in urban areas | शहरी भागातील नवजात बालकांत वाढला लठ्ठपणा

शहरी भागातील नवजात बालकांत वाढला लठ्ठपणा

googlenewsNext

उस्मानाबाद : बदलती जीवनशैली व फास्टफूडच्या अधिक सेवनामुळे अनेक महिला-पुरुष लठ्ठपणाचा शिकार होत आहेत. आता आई-वडील लठ्ठ असलेल्यांची नवजात मुलेही ४ किलोपेक्षा जास्त वजनाची जन्मत आहेत. जिल्हा स्त्री रुग्णालयात मागील दोन वर्षात ११ हजार २८४ बालकांचा जन्म झाला आहे. यातील ८२ बालकांचे वजन हे ४ किलोपेक्षा अधिक असल्याचे समाेर आले आहे. यातही शहरी भागातील अशा बालकांचे प्रमाण अधिक आहे.

जिल्हा स्त्री रुग्णालयात २०१९ मध्ये ५ हजार ७६३ महिलांची प्रसूती झाली. त्या महिलांनी जन्म दिलेल्या बालकांपैकी ५ हजार ६७६ बालकांचा जन्म सुखरूप झाला. त्यातील ५२ बालकांचे वजन ४ किलोपेक्षा अधिक होते. तर उर्वरित बालकांचे वजन ४ किलोपेक्षा कमी होते. त्या शिवाय, २०२० मध्ये ५ हजार ६८७ महिलांची प्रसूती झाली. महिलांनी जन्म दिलेल्या बालकांपैकी ५ हजार ७०८ बालकांचा जन्म सुखरूप झाला. त्यातील ३० बालकांचे वजन ४ किलोपेक्षा अधिक होते. मागील दोन वर्षातील एकूण बालकांच्या वजनावर नजर टाकल्यास ०.७ टक्के नवजात बालके लठ्ठ जन्मास आल्याचे स्त्री रुग्णालयातील आकडेवारीवरून स्पष्ट होते.

पाइंटर...

२०१९

५,७६३ जिल्हा स्त्री रुग्णालयात जन्मलेली मुले

५२ चार किलोपेक्षा जास्त वजनाची मुले

मुले ३४

मुली १८

२०२०

५६०८ जिल्हा स्त्री रुग्णालयात जन्मलेल्या मुली

३० चार किलोपेक्षा जास्त वजनाची एकूण मुले

मुले २४

मुली ६

चौकट...

८१ जुळ्यांचा जन्म

२०१९ या वर्षभरात ५ हजार ७६३ नवजात बालकांचा जन्म झाला होता. यात ३४ जुळे बालक जन्मास आली होती. तर २०२० मध्ये ५ हजार ६०८ बालकांचा जन्म झाला असून, यात ४७ जुळ्यांचा समोवश आहे.

शहरी मुलांचे प्रमाण अधिक

गत दोन वर्षात जन्मलेल्या बालकांत सरासरीपेक्षा अधिक वजन असलेली जी बालके होती. त्यामध्ये शहरी भागातील अधिक प्रमाण आहे. तर ग्रामीण भागातील बालकांचे वजन हे ३ किलोपेक्षा कमीच असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कोट...

बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, फास्टफूडचे अधिक सेवन यामुळे महिलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. अनुवांशिकतेनुसार त्या महिलांच्या नवजात मुलांचेही वजनही ४ किलोपेक्षा अधिक असते. लठ्ठपणा टाळण्यासाठी नियमित योगा, व्यायाम करणे गरजेचे आहे.

डॉ. स्मिता गवळी, वैद्यकीय अधीक्षक,

जिल्हा स्त्री रुग्णालय

Web Title: Obesity increased in newborns in urban areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.