जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा पोहोचला ७२३ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:31 IST2021-03-20T04:31:56+5:302021-03-20T04:31:56+5:30
डिसेंबर महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली होती. मात्र, पुन्हा मार्च महिन्यापासून बाधितांचा आकडा वाढू लागला आहे. मागील तीन दिवसांपासून ...

जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा पोहोचला ७२३ वर
डिसेंबर महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली होती. मात्र, पुन्हा मार्च महिन्यापासून बाधितांचा आकडा वाढू लागला आहे. मागील तीन दिवसांपासून प्रतिदिन शंभराच्या पुढेच रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. प्रशासनाकडून कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. तसेच बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व काेरोनासदृश लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी केली जात आहे. गुरुवारी दिवसभरात ५५७ व्यक्तींचे स्वॅब प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील ४५६ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल शुक्रवारी जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला. यात २७ जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. शिवाय, दिवसभरात १ हजार २ जणांची ॲँटिजेन टेस्ट करण्यात आली. यात ९२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. अशा एकूण ११९ जणांची भर पडली. त्यामुळे आता ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ७२३ वर पाेहोचला आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८२ टक्के
जिल्ह्यात १ लाख ४२ हजार २१५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील १४.२२ टक्के म्हणजेच १८ हजार ३४२ व्यक्तींचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. ५८९ जणांचा मृत्यू झाला, तर १७ हजार ३० व्यक्ती उपचाराअंती बरे झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९२.८२ टक्के एवढे आहे.
सर्वाधिक रुग्ण उस्मानाबाद तालुक्यात
शुक्रवारी परंडा तालुक्यात २, भूम तालुक्यात ३, लोहारा ४, तुळजापूर तालुक्यात ९, वाशी तालुक्यात ११, उमरगा तालुक्यात १७, कळंब तालुक्यात २५ रुग्णांची तर उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक ४८ रुग्ण आढळून आले.