तुळजाभवानी मंदिराचा गाभारा काढण्याचा निर्णय नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 10:28 IST2025-08-14T10:27:42+5:302025-08-14T10:28:04+5:30
तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यातील शिळांना तडे गेले आहेत

तुळजाभवानी मंदिराचा गाभारा काढण्याचा निर्णय नाही
धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरातील गाभारा काढण्यात येणार असल्याची माहिती ही निव्वळ अफवा असून, असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे बुधवारी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी स्पष्ट केले आहे. तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यातील शिळांना तडे गेले आहेत. याअनुषंगाने मंदिर संस्थानने पुरातत्त्व विभागाकडून संशोधन करून अहवाल देण्याची मागणी केली गेली आहे.
लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून पुरातत्त्व विभागाच्या पथकाने या प्रकाराचा अभ्यास केला आहे. मात्र, संस्थानला अद्याप त्याचा अहवाल मिळाला नसल्याचे अध्यक्षांनी सांगितले. तत्पूर्वी झालेल्या एका संशोधनात शिखरावर सिमेंट काँक्रिटचे आवरण दिल्याने त्याचा भार गाभाऱ्याच्या शिळांवर पडत असल्याचे पुरातत्व विभागाने म्हटले होते. मात्र, शिखरावरील आवरण काढणे किंवा गाभारा काढणे, याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.