शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षे उलटूनही महामार्ग होईना; सोलापूर-हैद्राबाद रस्त्यावर जीव झाले स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 16:31 IST

या कामासाठी जवळपास तीनशे हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. मात्र, गेल्या नऊ वर्षापासून सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम अजूनही चालूच आहे.

उस्मानाबाद : सोलापूर ते हैद्राबाद या महामार्गावरील शंभर किमी अंतराचे ठिगळ नऊ वर्षे उलटूनही शिवले जात नाहिये. अपूर्ण उड्डाणपुले, उखडलेले डांबरीकरण धोकादायक क्रॉसिंगमुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा ठरला आहे. असे असले तरी दोन ठिकाणी टोलवसुली मात्र जोमात सुरू आहे.

सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरीलउस्मानाबाद जिल्हा हद्दीतील खानापूर पासून कर्नाटक सिमेपर्यंतच्या शंभर किलोमीटर अंतराच्या चौपदरीकरणाच्या कामाची मूळ किंमत ९२२ कोटी आहे. २०११ पासून सर्वे सुरू झाला. २०१३ मध्ये कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सोलापूरच्या एसटीपीएल कंपनीने ठेका घेतला. या कामासाठी जवळपास तीनशे हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. मात्र, गेल्या नऊ वर्षापासून सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम अजूनही चालूच आहे. संथगतीने काम सुरू असल्याने डांबरीकरण सहा महिन्यात पुन्हा उखडून खड्डे पडायला सुरुवात होते. शिवाय, मुरूम मोड, आष्टामोड, जकेकूर चौरस्ता, मुळज फाटा, येणेगूर येथील उड्डाणपुलाचे काम अपूर्ण आहे. नवीन डांबरीकरण उखडल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे नियमित अपघात घडून येत आहेत. अपूर्ण काम आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केलेली नसतानाही दोन वर्षापासून ईटकळ व तलमोड नाक्यावरून टोल वसुली जोरात सुरू आहे.

चार वर्षांनंतरही खामगाव-पंढरपूर प्रगतीपथावरच...पश्चिम महाराष्ट्रास व्हाया मराठवाडा विदर्भाशी संलग्न करणाऱ्या साडेचारशे कोटी रुपयांच्या खामगाव-पंढरपूर महामार्गाचा २०१७ मध्ये श्रीगणेशा झाला. दोन वर्ष मुदतीच्या या कामास चार वर्ष लोटले तरी ते काम 'प्रगतीपथावर' असल्याने नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे. कळंब तालुक्यातील येरमाळा घाटात रस्ता खोदून ठेवल्याने अपघात तर होत आहेतच. मात्र, वाहनांची गती मंदावल्याने चोरट्यांचे फावते आहे. सोलापूर सीमेवर बालाघाटाच्या शिरोभागी धुळे-सोलापूर कार्यान्वित झाला आहे. दुसरीकडे हायब्रीड ॲन्युइटी तत्त्वाचा 'टच' लाभलेल्या कळंब-ढोकीचे काम पूर्ण पण दर्जा 'सुमार' झाला आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादhighwayमहामार्गAccidentअपघात