अणदूर येथील जवाहर विद्यालयातील आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा दिली हाेती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असता, १९ जण यशस्वी झाले आहेत. यापैकी नऊजण शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. यात स्वाती विश्वनाथ कर्पे, तनुजा महादेव पाटील, प्रांजली प्रभाकर राठोड, अंजली साहेबराव घुगे, विनीत संतोष सोनवणे, सानिका संगमेश्वर संगशेट्टी, सृष्टी नंदकुमार इनामदार, अवंती धनाजी नरवडे, हर्षल संजय पवार यांचा समावेश आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामचंद्र आलुरे, अणदूर बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी तात्याराव माळी, मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे, परीक्षा विभागप्रमुख अनिल गुरव यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना शिक्षक सिद्धलिंग स्वामी, संतोष बलसुरकर, हनुमंत गिरी, शशिकांत गवळी, महेश यादव, मनीषा कोरे, ज्योती चौधरी, कल्पना घुगे, वैशाली कासार यांचे मार्गदर्शन लाभले.
‘जवाहर’चे नऊ विद्यार्थी बनले शिष्यवृत्तीधारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:37 IST