धानुरी शाळेला मिळाल्या नवीन वर्गखोल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:38 IST2021-09-17T04:38:57+5:302021-09-17T04:38:57+5:30
धानुरी : लोहारा तालुक्यातील धानुरी येथे जिल्हा परिषद शाळेतील नवीन शाळा खोल्यांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा ...

धानुरी शाळेला मिळाल्या नवीन वर्गखोल्या
धानुरी : लोहारा तालुक्यातील धानुरी येथे जिल्हा परिषद शाळेतील नवीन शाळा खोल्यांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. दीपक जवळगे यांच्या हस्ते करण्यात आले.धानुरी येथे दहावीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा असून, ५० वर्षापूर्वीचे दगडी बांधकाम असणाऱ्या या शाळेच्या काही भिंतीना १९९३ च्या भूकंपामध्ये तडे गेले आहेत. यातच विद्यार्थी संख्या वाढत असल्याने वर्गखोल्यांची गरज भासत आहे. यामुळे प्रतिवर्षी नवीन वर्गखोल्यांसाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्याकडून जिल्हा परिषद सदस्या अश्विनी जवळगे यांनी धानुरी जिल्हा परिषद शाळेत नवीन खोल्या बांधकामासाठी २२ लाख रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला आहे. सदरील कामाचे भूमिपूजन ॲड. दीपक जवळगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच प्रवीण थोरात, उपसरपंच विठ्ठल बुरटुकणे, माजी सरपंच गणेश जाधव, माजी उपसरपंच संभाजी वडजे, तंटामुक्ती अध्यक्ष राम पाटील, तलाठी सय्यद, प्रभारी मुख्याध्यापक मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य सचिन तिघाडे, परमेश्वर साळुंके, संदिपान बनकर, मेघराज वडजे, श्रीकांत जाधव, राहुल जाधव, उमेश बनकर, सुभाष राठोड, शिवानंद राठोड, यशवंत बुवा, आरिफ देशमुख, सुभाष राठोड, सुरेश राठोड, नेताजी लुटे आदी उपस्थित होते.