कळंबमध्ये राष्ट्रवादीची वज्रमूठ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:31 IST2021-09-13T04:31:17+5:302021-09-13T04:31:17+5:30
उस्मानाबाद -राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सत्ता काळात कळंब शहरामध्ये माेठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. उर्वरित विकासकामांसाठीही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करावा, असे ...

कळंबमध्ये राष्ट्रवादीची वज्रमूठ कायम
उस्मानाबाद -राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सत्ता काळात कळंब शहरामध्ये माेठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. उर्वरित विकासकामांसाठीही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी केले. कळंबमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची वज्रमूठ कायम असल्याने आगामी निवडणुकीतही निश्चित यश मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शहरातील वसंतराव काळे संगणक महाविद्यालयाच्या सभागृहात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी माजी आमदार राहुल मोटे, प्रदेश चिटणीस सुरेश पाटील ,जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर, धनेश्वरी शिक्षण समूहाचे डॉ. प्रतापसिंह पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, तालुकाध्यक्ष प्रा. श्रीधर भवर, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. संजय कांबळे, भास्कर खोसे, युवकचे प्रदेश सरचिटणीस तारेक मिर्झा, प्रा. तुषार वाघमारे, शंतनू खंदारे, महम्मद चाऊस, सुनंदा भोसले यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
जिल्हाध्यक्ष प्रा. बिराजदार म्हणाले की, खा. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पुरोगामी विचार आणि तळागाळातील सर्वसामान्यांसाठी विकासात्मक भूमिका मांडूनच येणाऱ्या निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत. बैठकीला उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संख्या पाहून आपणा सर्वांच्या बळावर हाेऊ घातलेल्या निवडणुकीत निश्चित विजय मिळवू, असा ठाम विश्वास व्यक्त केला. माजी आमदार माेटे यांनीही यावेळी मनाेगत व्यक्त केले. भवर यांनी संघटनात्मक बाबींचा लेखाजाेखा मांडला. उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी पक्षाने नगरपालिकेच्या माध्यमातून मागील पाच वर्षांत राबविलेल्या विकासकामांची माहिती दिली. बैठकीस नगरसेवक अमर गायकवाड, सुभाष पवार, शकील काझी, किरण मस्के, भाऊ कुचेकर, सुमित रणदिवे, बापू सावंत, सलमा सौदागर, शहराध्यक्ष मुन्नी सय्यद, भीमा हगारे, दर्शना बचुटे, अतिक पठाण, सर्फराज मोमीन, महेश पुरी, उत्तरेश्वर चोंदे, दिनेश यादव आदी उपस्थित हाेते. सूत्रसंचालन शहराध्यक्ष मुसद्दीक काझी यांनी, तर आभार शहर कार्याध्यक्ष बाळासाहेब कथले यांनी मानले.