परंड्यातही राष्ट्रवादीचे आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST2021-07-04T04:22:14+5:302021-07-04T04:22:14+5:30

इंधन तसेच गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. याचे केंद्रातील भाजप सरकारला काहीही साेयरसुतक नाही. उलट गॅस सिलिंडरच्या ...

NCP's movement in Paranda too | परंड्यातही राष्ट्रवादीचे आंदाेलन

परंड्यातही राष्ट्रवादीचे आंदाेलन

इंधन तसेच गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. याचे केंद्रातील भाजप सरकारला काहीही साेयरसुतक नाही. उलट गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना गॅस सिलिंडर घेणे कठीण झाले आहे. उज्ज्वला याेजनेच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेल्या अनेक लाभार्थ्यांकडील गॅस सिलिंडर सध्या अडगळीला पडले आहेत. या दरवाढीकडे भाजपाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसने राज्यभरात आंदाेलन सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून शनिवारी परंडा शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकात आंदाेलन करून निषेध नाेंदविण्यात आला. हे आंदाेलन राष्ट्रवादीचे नवनाथ जगताप, तालुकाध्यक्ष संदीप पाटील, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, यशस्विनी अभियान तालुकाध्यक्ष राखी देशमुख, नगरसेविका रंजना माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष सचिन पाटील, राष्ट्रवादी महिला आघाडी तालुकाध्यक्ष स्वाती गायकवाड, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक बापू मिस्किन, ॲड. सुभाष वेताळ, बानगंगा कारखान्याचे संचालक मारुती मासाळ, नंदू शिंदे, श्रीहरी नाईकवाडी, संगीता खबाले, बंडू रगडे, विक्रम जाधव, नागनाथ थोरात, रामदास गवारे आदी उपस्थित हाेते. आंदोलनस्थळी दाखल हाेत प्रभारी तहसीलदार मिलिंद गायकवाड यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

Web Title: NCP's movement in Paranda too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.