तुळजाभवानीच्या दरबारात राष्ट्रवादीचा ‘गोंधळ’; हल्लाबोल आंदोलनाच्या दुसर्या टप्प्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 13:04 IST2018-01-16T13:02:23+5:302018-01-16T13:04:31+5:30
राष्ट्रवादीच्या दुसर्या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनास मंगळवारी तुळजापुरातून प्रारंभ करण्यात आला़ सकाळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवून जागरण गोंधळ घातला.

तुळजाभवानीच्या दरबारात राष्ट्रवादीचा ‘गोंधळ’; हल्लाबोल आंदोलनाच्या दुसर्या टप्प्यास प्रारंभ
तुळजापूर ( उस्मानाबाद ) : राष्ट्रवादीच्या दुसर्या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनास मंगळवारी तुळजापुरातून प्रारंभ करण्यात आला़ सकाळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवून जागरण गोंधळ घातला.
सरकारविरोधात राष्ट्रवादीने सुरु केलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा दुसरा टप्पा मराठवाड्यात सुरु झाला आहे़ मंगळवारी तुळजापुरातून याची सुरुवात झाली़ सकाळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खा़सुप्रिया सुळे, दिलीप वळसे-पाटील, डॉ़पद्मसिंह पाटील, राणाजगजितसिंह पाटील व पदाधिकार्यांनी देवीचे दर्शन घेवून येथील महाद्वारासमोर जागरण गोंधळ मांडला़ यानंतर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ यावेळी सरकारच्या कारभारावर नेत्यांनी सडकून टीका केली.