राष्ट्रवादी काॅंग्रेसचे लाेहारा शहरात आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST2021-07-04T04:22:13+5:302021-07-04T04:22:13+5:30
मागील काही महिन्यांपासून इंधन तसेच गॅसच्या दरामध्ये झपाट्याने वाढ हाेऊ लागली आहे. याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरावरही झाला आहे. ...

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे लाेहारा शहरात आंदाेलन
मागील काही महिन्यांपासून इंधन तसेच गॅसच्या दरामध्ये झपाट्याने वाढ हाेऊ लागली आहे. याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरावरही झाला आहे. ही दरवाढ सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. सदरील प्रश्नी जनतेतून राेष व्यक्त केला जात आहे. असे असतानाही केंद्रातील भाजप सरकार याबाबत सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असा निर्णय घेण्यास राजी नाही. दरम्यान, या दरवाढीच्या विराेधात राष्ट्रवादी काॅंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदाेलने करण्यात येत आहेत. शनिवारी लाेहारा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात आंदाेलन करण्यात आले. गॅसच्या टाकीला चपलांचा हार घालून निषेध नाेंदविला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, नागाण्णा वकील, युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, शहर अध्यक्ष आयुब शेख, शबीर गवंडी, जालिंदर कोकणे, हाजी बाबा शेख, सुरेश वाघ, बहाद्दूर मोमीन, सलमान सवार, उमेश देवकर, राजेंद्र कदम, अभिजित लोभे, मिलिंद नागवंशी, गगन माळवदर, ताहेर पठाण आदी उपस्थित हाेते.