नंदगाव-जळकाेट रस्ता खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:36 IST2021-09-06T04:36:57+5:302021-09-06T04:36:57+5:30

नंदगाव (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्यातील नंदगाव ते जळकोट या रस्त्याची चक्क चाळण झाली आहे. रस्त्यावर खड्डे आहेत की ...

Nandgaon-Jalkaet road in a pit | नंदगाव-जळकाेट रस्ता खड्ड्यात

नंदगाव-जळकाेट रस्ता खड्ड्यात

नंदगाव (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्यातील नंदगाव ते जळकोट या रस्त्याची चक्क चाळण झाली आहे. रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे, हे कळायला मार्ग नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने थाेडाबहुत पाऊस झाला तरी खड्ड्यांना डबक्याचे स्वरूप येते.

नंदगाव ते जळकोट या रस्त्याची दुरवस्था मागील सात ते आठ वर्षांपासून कायम आहे. तेव्हापासून या भागातील लाेकांना खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात सातत्याने लहान-माेठे अपघात हाेत आहेत. त्यामुळे हा रस्ता नव्याने करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे, परंतु आजवर केवळ खड्डे बुजवून तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम झाले. या रस्त्याच्या डागडुजीसाठी प्रत्येक वर्षी दीड ते दाेन लाख रुपये खर्च केला जात आहे. त्यामुळे मागील सात वर्षांत सुमारे १२ ते १४ लाख रुपये खर्च झाले असतील. या रकमेत तर नव्याने रस्ता झाला असता, असे ग्रामस्थांतून बाेलले जात आहे. दरम्यान, सततच्या मलमपट्टीला आता ग्रामस्थ वैतागले आहेत. त्यामुळे हा रस्ता नव्याने करण्यात यावा, अशी मागणी सरपंच सरस्वती कलशेट्टी , उपसरपंच कावेरी काटे, उपसरपंच कमलाकर तुप्पे, धुळप्पा कलशेट्टी यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे. यावेळी वैभव पाटील, मल्लिनाथ धरणे, प्रदीप वाघमारे, अरुण कुलकर्णी, पंचप्पा पाटील, सतीश बशेट्टी, धोंडप्पा पांचाळ, प्रेमनाथ सुतार, अंबर सुतार, प्रशांत कलशेट्टी, वैभव घंटे, सुरेश वाले, राजकुमार चिनगुंडे आदी उपस्थित हाेते.

Web Title: Nandgaon-Jalkaet road in a pit