शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

घात की अपघात! पुरुषासह दोन महिलांचे मृतदेह आढळले पळस निलेगाव तलावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:35 IST

तुळजापूर तालुक्यातील बाभळगावजवळील घटना

अणदूर (जि.धाराशिव) : तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील पळस निलेगाव प्रकल्पाच्या तलावावरील पुलाखाली पाण्यावर तरंगताना तिघांचे मृतदेह सोमवारी दुपारी आढळले आहेत. यामध्ये दोन महिला व एक पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान, येथून एक दुचाकीही पोलिसांनी बाहेर काढली असून, घात की अपघात, यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत.

सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बाभळगाव तलावावरील पुलाखाली पाण्यावर तिघांचे मृतदेह तरंगताना काही नागरिकांना आढळून आले. यानंतर नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढले. मृतदेहांच्या अवस्थेवरून ते दोन दिवसांपूर्वी पाण्यात बुडाले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केली. त्यांची ओळख पटवली असता हे तिघेही उमरगा तालुक्यातील मुरुम येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. आयुब नदाफ (४५), जया लक्ष्मण कांबळे (३०), रेशमा होडगी (३२) अशी या मृतांची नावे आहेत. या घटनेमागचे कारण स्पष्ट झाले नाही. दोन दिवसापूर्वी ही तिघेही गावातून दुचाकीवरून गेल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

दुचाकीसह कोसळल्याचा अंदाजबाभळगाव येथील पुलाचे काम अर्धवट आहे. याच पुलावर तीन महिन्यांपूर्वी एक एसटी खाली कोसळताना बचावली होती. तर याच पुलावर दोन महिला शिक्षिकांना आपला प्राण गमवावा लागला. आता पुन्हा याच ठिकाणी ही घटना घडली आहे. येथील पुलाला कठडा नसल्यामुळे या घटनेतील तिघेही दुचाकीसह खाली कोसळले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दुचाकीही पाण्याबाहेर काढली आहे.

टॅग्स :dharashivधाराशिवCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात