श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:33 IST2021-01-25T04:33:10+5:302021-01-25T04:33:10+5:30
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : नवरात्र महाेत्सवातील चाैथ्या माळेनिमित्त रविवारी श्री तुळजाभवानी देवीची श्रीकृष्णरूपी मुरली अलंकार विशेष महापूजा मांडण्यात आली ...

श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : नवरात्र महाेत्सवातील चाैथ्या माळेनिमित्त रविवारी श्री तुळजाभवानी देवीची श्रीकृष्णरूपी मुरली अलंकार विशेष महापूजा मांडण्यात आली हाेती. आई राजा उदे - उदेच्या जयघाेषात हजाराे भाविकांनी या महापूजेचे दर्शन घेतले.
रविवारी पहाटे चरणतीर्थ विधी आटाेपल्यानंतर सकाळी ६ वाजता शाकंभरी यजमान बळवंत कदम व मनोजा कदम या दाम्पत्याच्या हस्ते दुग्धाभिषेक हाेऊन श्री तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेस प्रारंभ झाला. या पूजेनंतर यजमानांच्या हस्ते नैवेद्य व कापूर आरती, अंगारा आदी दैनंदिन विधी पार पडले. यानंतर यजमान कदम दाम्पत्य यांनी मंदिरातील उपदेवतांना जल अर्पण करून दर्शन घेतले. यानंतर कदम दाम्पत्याने शाकंभरी प्रतिमेचे पूजन करून घटकलशास चौथी पुष्पमाला अर्पण करून शाकंभरी देवीची आरती केली. दरम्यान, भोपे पुजारी बांधवांनी नवरात्रातील चौथ्या माळेनिमित्त श्री तुळजाभवानीची कृष्णरूपी मुरली अलंकार विशेष महापूजा मांडली होती. यात श्री तुळजाभवानी माता दोन्ही हातात मुरली धरून ती वाजवत आहे, अशी मांडणी करण्यात आली होती. शाकंभरी नवरात्र व रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.