प्रभारी नगराध्यक्षपदी मुंदडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST2021-06-24T04:22:37+5:302021-06-24T04:22:37+5:30

कळंब : येथील प्रभारी नगराध्यक्ष पदाची सूत्रे उपनगराध्यक्ष संजय मुंदडा हे शुक्रवारी हाती घेणार असल्याची माहिती आहे. नगराध्यक्षा ...

Mundada as the mayor in charge | प्रभारी नगराध्यक्षपदी मुंदडा

प्रभारी नगराध्यक्षपदी मुंदडा

कळंब : येथील प्रभारी नगराध्यक्ष पदाची सूत्रे उपनगराध्यक्ष संजय मुंदडा हे शुक्रवारी हाती घेणार असल्याची माहिती आहे. नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे एक महिन्याच्या रजेवर जात असल्याने मुंदडा यांच्याकडे हा पदभार दिला जाणार आहे.

कळंब न. प. मध्ये सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. यापूर्वी उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांच्या पुढाकारातून न. प. तील राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांना प्रभारी उपनगराध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली होती. राष्ट्रवादीचा हा सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा पॅटर्न तेव्हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला होता. कोरोना परिस्थिती नियंत्रणात राहिली तर न. प. च्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होतील. त्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी मागील निवडणुकांत शहरवासीयांना दिलेली उर्वरित आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी सत्ताधारी मंडळींवर आहे.

मागील चार-साडेचार वर्षांच्या कालावधीत न. प. मध्ये अनेक विकासकामांच्या माध्यमातून शहरात विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्याचा दावा सत्ताधारी मंडळींकडून करण्यात येत आहे. या कालावधीत न. प. तील विरोधकही सत्ताधारी मंडळींना विकासाच्या मुद्द्यावर अडचणीत आणताना दिसले नाहीत. ही बाबही सत्ताधारी राष्ट्रवादीच्या कारभारासाठी सकारात्मक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांच्या साथीने न. प. तील कारभार सांभाळणारे उपनगराध्यक्ष संजय मुंदडा हे शुक्रवारी प्रभारी नगराध्यक्षपदाचा कारभार सांभाळणार आहेत. न. प. च्या अनेक योजना मंजुरीसाठी शासन दरबारी प्रलंबित आहेत. काही योजनांना निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे मुंदडा यांच्या महिनाभराच्या प्रभारीपदाच्या कालावधीत यातील काही कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा शहरवासीयांतून व्यक्त केली जात आहे.

चौकट -

पक्षश्रेष्ठींचाही ग्रीन सिग्नल

नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांनी एक महिन्याच्या रजेवर जात असल्याचे कळवून पदभार उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांना देत असल्याचे पक्षाचे पालकमंत्री संजय बनसोडे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांना कळविल्याची माहिती आहे. त्यांनीही या निर्णयाला ग्रीन सिग्नल दिल्याने शुक्रवारी मुंदडा यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार दिला जाणार आहे.

Web Title: Mundada as the mayor in charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.