शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

MPSC Exam : लॉकडाऊनमुळे गावी परतलेल्या विद्यार्थ्यांसमोर केंद्रावर जाण्याचा पेच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 5:38 PM

परीक्षा केंद्र निवडलेल्या शहरांतील कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता, परीक्षेसाठी जायचे कसे, असा पेच विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देहजारो एमपीएससीची विद्यार्थी चिंतेत परीक्षा सेंटर म्हणून जिल्ह्याचे ठिकाण द्यावे

- समिर सुतके

उमरगा (जि. उस्मानाबाद)  : सराकरी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून मुंबई-पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी गेलेले शेकडो विद्यार्थी लॉकडाऊनमुळे आपल्या मूळगावी परत आले आहेत. परिस्थिती पूर्वपदावर कधी येणार? हे सांगणे कठीण आहे. असे असतानाच राज्यसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा १३ सप्टेंबर रोजी होत आहे. गावी परतलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे यासारख्या महानगरातील परीक्षा केंद्र निवडली आहेत. परंतु, अशा शहरांतील कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता, परीक्षेसाठी जायचे कसे, असा पेच विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्याचे ठिकाण परीक्षा केंद्र म्हणून निवडण्याची मुभा द्यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

तालुक्यातील शेकडो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या ठिकाणी जातात. जिल्ह्यातून ही या महानगरांमध्ये  हजारो विद्यार्थी गेलेले आहेत. तिथे महागडे क्लासेस लावून किरायाच्या खोल्याही घेतल्या. योग्यपद्धतीने अभ्यास सुरू असताना कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. आता तर संपूर्ण राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. महानगरातील बहुतांशजण आता आपल्या मूळ गावी परतले आहेत. गावात येऊन त्यांनी आपला अभ्यास आॅनलाइन पद्धतीने सुरू ठेवला. अशातच राज्य लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होईल, असे जाहीर केले. पीएसआय, एसटीआय, एएसओ या परीक्षा ११ आॅक्टोबरला होणार आहेत. तर केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा ४ आॅक्टोबर रोजी होणार आहे. या सर्व प्रकारच्या परीक्षेसाठी हजारोच्या संख्येने विद्यार्थी बसतात. 

यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी मुंबई-पुण्यात या सारख्या महानगरातील परीक्षा केंद्र निवडली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे ही मंडळी आता गावात आली. अनेकांनी आपल्या भाड्याच्या खोल्याही सोडल्या आहेत. अशा स्थितीत तालुक्यासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मुंबई, पुण्यासारख्या शहरातील केंद्रावर जाणे कठीण झाले आहे. विशेषत: ग्रामीण गरीब होतकरू विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. ही अडचण लक्षात घेता, मूळ गावी असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच जिल्ह्याच्या ठिकाणचे केंद्र निवडण्याची मूभा द्यावी, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.  

जिल्ह्यानुसार केंद्र द्यावेमी दोन ते तीन वर्षापासून परीक्षेची तयारी पुण्यामध्ये करीत होतो. परंतु, कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मी गावी परतलो. लोकसेवा आयोगाची परीक्षा ही १३ सप्टेंबर रोजी सुधारित वेळापत्रकानुसार होत आहे. मात्र, माझे परीक्षा केंद्र पुण्यात आहे. सध्या हे शहर कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. अशा शहरात जाऊन परीक्षा देणे कठीण आहे. त्यामुळे आमच्या जिल्ह्यानुसार केंद्र द्यावे. - हनुमंत सोलंकर,कोरेगाववाडी

पुण्यात परत जाऊन परीक्षा देणे कठीण१३ सप्टेंबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि ११ आॅक्टोबर रोजी संयुक्त पूर्व परीक्षा होत आहे. मी दोन वर्षांपासून पुणे येथे परीक्षेची तयारी करीत आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावी आले आहे. आताच्या परिस्थितीत पुण्यात जाऊन परीक्षा देणे कठीण आहे. त्यामुळे आम्हाला लातूर वा उस्मानाबाद सेंटर द्यावे. - पूजा उदबळे, उमरगा

एमपीएससीशी पत्रव्यवहार करणारअनेक विद्यार्थी महानगरात कोचिंगसाठी गेले होते. परंतु आता ते परत आले आहेत. त्यांच्यापुढे परीक्षेला जाण्याचा प्रश्न आहे. अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलून देण्यासाठी आपण एमपीएससीशी पत्रव्यवहार करणार आहोत. शासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्यावा.- डॉ.राम जाधव, संचालक, दिशा अकादमी, उमरगा

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाOsmanabadउस्मानाबादStudentविद्यार्थी