प्रारंभी ग्रामपंचायतीच्या वतीने हणमंत गवळी यांच्या हस्ते खासदार ओमराजे निंबाळकर यांचा तर उपसरपंच हमीद पठाण यांच्या हस्ते आ. कैलास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी गतवर्षीचा पीक विमा, सिमेंट रस्ते तसेच तामलवाडीमध्ये नवीन भुयारी मार्ग तयार करणे अशा विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली. तसेच तामलवाडी येथे प्रस्तावित असलेल्या नवीन औद्योगिक वसाहती संदर्भातही सकारात्मक चर्चा झाली. सूत्रसंचलन सर्जेराव गायकवाड यांनी केले.
यावेळी ग्रा. पं. सदस्य सतीश माळी, अप्पासाहेब रणसुरे, गण प्रमुख दत्तात्रय गवळी, संभाजी माळी, शाहीर गायकवाड, मुकुंद गायकवाड, अमोल घोटकर, तुकाराम गायकवाड, एकनाथ गायकवाड, चन्नपा मसुते, मारूती पाटील, बसवणप्पा मसुते, नागनाथ गवळी, शिवाजी सावंत, कृष्णा घोटकर, निरंजन करंडे, पांडुरंग लोंढे, ज्ञानेश्वर जगताप, ज्ञानेश्वर कदम, सुधाकर लोंढे, नारायण जाधव, नामदेव सुरवसे, महादेव गुंड, अमोल शिंदे, प्रशांत गायकवाड, समाधान गायकवाड, नागेश घोटकर, नागनाथ शिंदे आदी उपस्थित होते.