काेराेना तपासणी केंद्र स्थलांतरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:30 IST2021-05-01T04:30:55+5:302021-05-01T04:30:55+5:30

कळंब - शहरातील पुनर्वसन सावरगाव भागातील नगरपरिषद शाळा क्र. २ मध्ये काेराेना तपासणी केंद्र सुरू ...

Move to Carina Check Center | काेराेना तपासणी केंद्र स्थलांतरित करा

काेराेना तपासणी केंद्र स्थलांतरित करा

कळंब - शहरातील पुनर्वसन सावरगाव भागातील नगरपरिषद शाळा क्र. २ मध्ये काेराेना तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे केंद्र भर वस्तीत आहे. परिसरातील रहिवाशांची सुरक्षा लक्षात घेता, हे केंद्र इतरत्र हलवावे, अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम यांनी केली आहे. हे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दिले आहे.

संशयित रूग्णांची काेराेना चाचणी करण्यासाठी पुनर्वसन सावरगाव परिसरातील नगरपरिषद शाळेच्या इमारतीत केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या सर्व बाजूंनी दाट लाेकवस्ती आहे. त्यामुळे परिसरातील लाेकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब लक्षात घेता येथील तपासणी केंद्र इतरत्र स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. दरम्यान, याबाबत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम व तानाजी चव्हाण यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांच्याकडे केली आहे.

Web Title: Move to Carina Check Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.