शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल ॲप लावणार अपघातांना ब्रेक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : राज्य महामार्गावर रस्त्याचे काम उत्तम झाले असले तरी अपघाताचे प्रमाण मात्र घटले नाही. उलट त्यामध्ये आणखी वाढ ...

उस्मानाबाद : राज्य महामार्गावर रस्त्याचे काम उत्तम झाले असले तरी अपघाताचे प्रमाण मात्र घटले नाही. उलट त्यामध्ये आणखी वाढ झाली आहे. या वाढत्या अपघातांना नियंत्रित करण्यासाठी आयआरएडी अर्थात इंटिग्रेटेड रोड ॲक्सिडेंट प्रकल्प राबविला जाणार आहे. हे एक सॉफ्टवेअर आहे. त्यामध्ये अपघाताची संपूर्ण माहिती संकलित केल्यानंतर त्यातून अपघाताचे कारण शोधून त्यावर उपाययोजना करणे सुलभ होणार आहे. अपघात घडल्यानंतर त्या ठिकाणचा ऑनलाइन पंचनामा होणार आहे. याशिवाय अपघाताच्या वेळी त्या ठिकाणचे वातावरण कसे होते, याची नोंद होईल, रस्त्याची स्थिती कशी आहे. गाडीची स्थिती कशी होती. या संपूर्ण बाबीची माहिती सॉफ्टवेअरवर ऑनस्पॉट भरली जाणार आहे. यामुळे रस्त्याचा संपूर्ण अहवाल या सॉफ्टवेअरवर येणार आहे. यातून अपघाताचे नेमके कारण पुढे येईल. या दृष्टीने आयआरडी प्रकल्प महत्त्वाचा आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

आता नव्याने अपघाताची नोंद होणार

पूर्वी अपघात घडल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभाग अपघातग्रस्त स्थळावर प्रत्यक्ष पाहणी करीत होते. संबंधिताना माहिती देत होते.

आता ही संपूर्ण माहिती आयआरएडी सॉफ्टवेअरवर डाऊनलोड होणार आहे. अद्ययावत प्रणालीमध्ये सध्यातरी कुठलीही माहिती डाऊनलोड झाली नाही. पुढील काळात ही माहिती नवीन प्रकल्पातून भरली जाणार आहे.

असे चालणार कामकाज

या प्रकल्पामध्ये अपघाताचा स्पॉट पंचनामा ऑनलाइन होणार आहे. या ठिकाणची संपूर्ण रस्त्याची कंडिशन कशी होते, याची नोंद या ॲपमध्ये घेतली जाणार आहे. त्यासाठी बांधकाम विभागाची यंत्रणा, पोलीस यंत्रणा, वैद्यकीय यंत्रणा, उपप्रादेशिक परिवहन विभागाची यंत्रणा एकत्र येऊन हा पंचनामा करेल आणि संपूर्ण माहिती संकलित करून सॉफ्टवेअरवर अपलोड करील. सध्या पोलीस व आरटीओ विभाग दोन विभागाचे कामकाज सुरू आहे.

६६ जणांना प्रशिक्षण

उपप्रादेशिक परिवहन विभागाने रस्ते अपघात नियंत्रित करण्यासाठी आयआरएडी म्हणजेच इंटिग्रेटेड रोड ॲक्सिडेट प्रकल्प या प्रशिक्षणासाठी ११ अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे. तर जिल्ह्यातील १८ पोलीस ठाण्यातील ५५ अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षित केले आहे.

अपघात घडल्यास माहिती कशी भरायची, याबाबत माहिती दिली आहे.

जिल्ह्यातील रस्ते अपघात

रोड अपघात जखमी मृत्यू

२०१९ ६६१ ५५१ २३८

२०२० ४७५ ३८४ २३२

२०१९ मध्ये झालेले अपघात ६६१

आतापर्यंत ८५ अपघातांची नोंद

जिल्ह्यात मे महिन्यापासून या प्रकल्पांतर्गत कामकाम सुरू झाले आहे. जिल्ह्यातील १८ पोलीस ठाण्यांतर्गत जानेवारी २०२१ पासून घडलेल्या अपघातांची नोंद केली जात आहे. अद्यापपर्यंत ८५ अपघातांची नोंद झालेली आहे.

जीव वाचविण्यास होईल मदत

या प्रकल्पात आरटीओ, पोलीस, वैद्यकीय यंत्रणा, बांधकाम विभाग यंत्रणा एकत्र येऊन काम करणार आहेत. माहिती संकलित झाल्यानंतर कोणत्या ठिकाणी अपघात जास्त हाेतात. अपघाताचे नेमके कारण हे शोधणे सोपे होणार आहे. त्यामुळे अपघात रोखण्यास मदत होईल व त्यातून जीव वाचण्यास मदत होणार आहे.