मुख्यमंत्र्यांना मयत शेतकऱ्याचा अस्थि कलश पाठवून मनसेने केली मदतीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 19:38 IST2019-01-04T19:15:37+5:302019-01-04T19:38:37+5:30
उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत

मुख्यमंत्र्यांना मयत शेतकऱ्याचा अस्थि कलश पाठवून मनसेने केली मदतीची मागणी
उस्मानाबाद : तालुक्यातील तावजरखेडा येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत़ मात्र, याकडे शासन, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मयत शेतकऱ्याचा अस्थिकलश जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविला़
उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत़ दोन दिवसात या आत्महत्या झालेल्या असताना प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही़ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट देणे, त्यांच्याशी संवाद सधण्यात आलेला नाही़ त्यामुळे मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे, तावरजखेड्याचे सरपंच मुरली देशमुख यांनी मयत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांसमवेत शुक्रवारी दुपारी अस्थि कलश घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला़ विविध मागण्यांचे निवेदन आणि मयत शेतकऱ्याचा अस्थि कलश जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आला़ यावेळी मारूती सागर, प्रेमचंद सुरवसे, बबन कोळी, सौरभ देशमुख, संजय पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.