दूध उत्पादन, फटाका उद्योगास मदत करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:33 IST2021-09-19T04:33:37+5:302021-09-19T04:33:37+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील दूध उत्पादन आणि फटाका उद्योगास सर्वतोपरी मदत करून, या उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन पालकमंत्री शंकरराव गडाख ...

दूध उत्पादन, फटाका उद्योगास मदत करणार
उस्मानाबाद : जिल्ह्यातील दूध उत्पादन आणि फटाका उद्योगास सर्वतोपरी मदत करून, या उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.
सरमकुंडी फाटा येथे या व्यवसायिकांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे शोभेच्या फटाक्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते. येथील फटाके आणि शोभेच्या वस्तू देशभरात प्रसिद्ध आहेत, परंतु त्यांच्या काही अडचणी आहेत, तसेच भूम-कळंब-वाशी तालुक्यात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांची या तालुक्यात मोठी बाजारपेठ आहे. याही उत्पादकांची पालकमंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेऊन, या दोन्ही उद्योगांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.
दुधापासून खवा निर्मितीचे कस्टर भूम आणि परिसरात उभारण्यात आले आहे. त्यांच्याही काही अडचणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मांडल्या.