गुणवंत विद्यार्थ्यांचा भोसगा येथे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:39 IST2021-09-08T04:39:25+5:302021-09-08T04:39:25+5:30

महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा व नॅशनल स्कॉलरशिप स्पर्धा या परीक्षेमध्ये या शाळेतील वीस विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. एनएसएसई ...

Meritorious students felicitated at Bhosga | गुणवंत विद्यार्थ्यांचा भोसगा येथे सत्कार

गुणवंत विद्यार्थ्यांचा भोसगा येथे सत्कार

महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा व नॅशनल स्कॉलरशिप स्पर्धा या परीक्षेमध्ये या शाळेतील वीस विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. एनएसएसई या स्पर्धा परीक्षेत प्राची कुडूकुले राज्यातून चौथी, एमटीएस परीक्षेत पार्थ प्रशांत माने हा जिल्ह्यातून प्रथम, तर राज्यात दहावा क्रमांक, सृष्टी विजय चव्हाण राज्यातून सतरावी आली. यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेचे अध्यक्ष डॉ. सचिन शेंडगे, प्रा. जी. के. घोडके, प्रा. ए. बी. दुधभाते यांनी सत्कार करून मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अरविंद पोतदार यांनी केले. पालक प्रतिनिधी म्हणून धनराज कुडकले, प्राचार्य महेश शिवणेचारी, योगेश वाघमोडे, प्रियंका बलसुरे, पूजा पांचाळ, प्रज्ञा चुंगे, सुषमा माने यांच्यासह शाळेतील विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: Meritorious students felicitated at Bhosga