मयुरी जाधव, तुकाराम जाधव बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:32 IST2021-02-10T04:32:30+5:302021-02-10T04:32:30+5:30

उमरगा : तालुक्यातील तुरोरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मयुरी जाधव, तर उपसरपंचपदी तुकाराम जाधव यांची सोमवारी निवड झाली. निवडीनंतर त्यांचा सत्कार ...

Mayuri Jadhav, Tukaram Jadhav unopposed | मयुरी जाधव, तुकाराम जाधव बिनविरोध

मयुरी जाधव, तुकाराम जाधव बिनविरोध

उमरगा : तालुक्यातील तुरोरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मयुरी जाधव, तर उपसरपंचपदी तुकाराम जाधव यांची सोमवारी निवड झाली. निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. येथे उपसरपंच पदासाठी एकच अर्ज असल्याने उपसरपंचांची बिनविरोध निवड झाली, तर सरपंच पदासाठी मयुरी नितीन जाधव व विजया प्रदीप जाधव यांनी अर्ज दाखल केला होता. यात मयुरी जाधव यांना नऊ मते, तर विजया जाधव यांना आठ मते पडली. त्यामुळे सरपंचपदी मयुरी जाधव यांची निवड करण्यात आली. यावेळी सदस्य ज्ञानेश्वर पाटील, विकास जाधव, तुकाराम मंमाळे, मालन मनियार, अलका कोल्हे, पॅनलप्रमुख राम जाधव, पंडित शिंदे, प्रभाकर जाधव आदी उपस्थित होते. पीठासीन अधिकारी म्हणून सतीश शेटगार यांनी काम पाहिले. त्यांना तलाठी विजयकुमार पाटील व ग्रामविकास अधिकारी एस. एस. कांबळे यांनी साह्य केले.

Web Title: Mayuri Jadhav, Tukaram Jadhav unopposed