विवाहितेचा मृत्यू; पाच जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:41 IST2021-09-16T04:41:01+5:302021-09-16T04:41:01+5:30
लोहारा तालुक्यातील होळी येथील मधुकर सिद्राम बिराजदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी महानंदा हिचा विवाह सन २००८ साली एकोंडी ...

विवाहितेचा मृत्यू; पाच जणांविरुद्ध गुन्हा
लोहारा तालुक्यातील होळी येथील मधुकर सिद्राम बिराजदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी महानंदा हिचा विवाह सन २००८ साली एकोंडी (ज) येथील शाहुराज महादेवराव ढोले यांच्याशी झाला. लग्नानंतर मुलीला सात-आठ वर्ष चांगले नांदविले. त्यानंतर मात्र सोने, पैशासाठी तिचा सासरच्या मंडळींकडून छळ होऊ लागला. ही बाब तिने सांगितल्यानंतर गावातील परिचयातील लोकांना सोबत घेऊन मागील वर्षी मुलगी महानंदा हिच्या सासरी एकोंडी (ज) येथे जाऊन नवरा, सासू, दीर, जाऊ व नणंद यांना मुलगी महानंदा हिचा छळ करू नका म्हणून विनंती केली होती. त्यानंतरही वरील लोक मुलगी महानंदा हिचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. या छळाला कंटाळून महानंदा हिने बुधवारी सकाळी स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या मृत्यूस वरील सासरचे लोक कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून बुधवारी सायंकाळी पती शाहुराज महादेवराव ढोले, शांताबाई महादेवराव ढोले (सासू), ईश्वर महादेवराव ढोले (दीर), अर्चना ईश्वर ढोले (जाऊ) व कसगी येथे राहणाऱ्या नणंद यांच्याविरोधात उमरगा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे करीत आहेत.