मराठवाडा मुक्तीदिन समृती वाचनालय सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST2021-09-18T04:35:30+5:302021-09-18T04:35:30+5:30

लोहारा : लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील राष्ट्रीय शाळेचे शताब्दी वर्ष व ७५ व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून ...

Marathwada Liberation Day Memorial Library started | मराठवाडा मुक्तीदिन समृती वाचनालय सुरू

मराठवाडा मुक्तीदिन समृती वाचनालय सुरू

लोहारा : लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील राष्ट्रीय शाळेचे शताब्दी वर्ष व ७५ व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी स्वामी रामानंद तीर्थ विद्यालय येथे ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने मराठवाडा मुक्तीदिन स्मृती वाचनालयाची सुरूवात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते करण्यात आली.

याप्रसंगी ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आमदार ज्ञानराज चौगुले हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सर्वप्रथम जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व आमदार ज्ञानराज चौगुले यांनी येथील स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यानंतर वाचनालयाची फित कापून शुभारंभ करण्यात आला. या वाचनालयात साहित्यिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भविष्यात याठिकाणी भव्य असे वाचनालय उभे करून त्यातून मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा संपूर्ण इतिहास व या लढ्यातील हिप्परगा रवा शाळेचे महत्व याबाबतची सखोल माहिती लोकांना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार चौगुले यांनी सांगितले. यावेळी हैद्राबाद मुक्तिसंग्राम पुस्तकाचे लेखक वसंतराव पोतदार यांच्या पत्नी सुशिलाबाई वसंतराव पोतदार यांच्यासह श्रीधर गोपाल देशमुख, सातप्पा होनाळकर, रूक्मीनबाई पंढरी मुळे आदींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास युवा नेते किरण गायकवाड, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, लोहारा तहसीलदार संतोष रुईकर, गटविकास अधिकारी सोपान अकिले, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, सरपंच राम मोरे,युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, अविनाश माळी, श्रीकांत भरारे, इंद्रजीत लोमटे, मुख्याध्यापक एस.बी. भोईटे ,धर्मवीर जाधव, संतोष गवळी,बाजीराव जाधव, विजय पवार, रुक्मीनबाई होनाळकर, ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे विजय वडदरे,प्रदीप मदने, अमर सगर, बी.के. पवार, नामदेव लोभे, जगन पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Marathwada Liberation Day Memorial Library started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.