ओबीसी टक्का वाढवून मराठा आरक्षण शक्य - खेडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 06:03 IST2018-09-09T06:03:20+5:302018-09-09T06:03:22+5:30
मराठा आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणाचे धोरण घेत आहे़

ओबीसी टक्का वाढवून मराठा आरक्षण शक्य - खेडेकर
परंडा (जि़उस्मानाबाद) : मराठा आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणाचे धोरण घेत आहे़ राज्यघटनेत बदल करून आरक्षण शक्य नाही अन् आर्थिक निकषांवर ते घटनाबाह्य ठरणारे आहे़ त्यामुळे मराठा आरक्षणाला एकमेव पर्याय ओबीसी आरक्षण वाढवणे हा असल्याचे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले़
पत्रकारांशी बोलताना खेडेकर ते म्हणाले, आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणाचे धोरण घेत आहे. राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्यास मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते. याकरिता शासनाने एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे़ मराठा तरूण आरक्षणावरून संभ्रमावस्थेत आहेत. मराठा आंदोलनाला नेतृत्व नाही, आंदोलनामुळे मराठा विरुद्ध गैर मराठा असा द्वेष निर्माण झाला आहे. युवकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलने करावीत, असे आवाहनही त्यांनी केले़