शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

मांजरा प्रकल्पातून विसर्ग वाढला; वाकडी गावातील १७ ग्रामस्थ पुरात अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 9:39 AM

Rain in Osmanabad : काठोकाठ भरलेल्या मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सलग चार दिवसापासून पाऊस होत आहे.

कळंब : मांजरा प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने तालुक्यातील वाकडी (ई) गावातील लोक प्रभावीत झाले असून तीन घराला पाण्याने वेढा दिल्याने अडकलेले १७ व्यक्ती छतावर बसून मदतीची हाक देत आहेत.दरम्यान,याठिकाणी एनडीआरएफच्या टीमला पाचारण केले आहे.

काठोकाठ भरलेल्या मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सलग चार दिवसापासून पाऊस होत आहे. यास्थितीत पाण्याचा उजवा कालवा व सहा दरवाजातून विसर्ग केला जात असला तरी सातत्यपूर्ण पावसाने आवक वाढत असल्याने मंगळवारी पहाटे पाच वाजता इतर १२ दरवाजातून ही पाणी सोडण्यात आले.

यामुळे विसर्ग वाढल्याने लाभक्षेत्रातील वाकडी (ई) गावात पाणी शिरले आहे. यात गावातील एका वस्तीवरील तीन घराला पाण्याचा वेढा बसला आहे. यामुळे घराच्या छतावर अडकलेले  १७ व्यक्ती मदतीची हाक देत आहेत.

▪️प्रशासन गावात दाखल...

दरम्यान, तहसीलदार विद्या शिंदे, मंडळ अधिकारी शंकर पाचभाई, सपोनि वैभव नेटके यांच्यासह अधिकारी गावात दाखल होवून मदतीसाठी प्रयत्नशील आहेत.

▪️एनडीआरएफच्या टिमला पाचारण

वाकडी येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना पाण्यातून बाहेर काढने शक्य नसल्याने ऊस्मानाबाद येथून एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे.

एकीकडे मांजरा दुथडी वाहत असतानाच इतर भागातील तेरणा, वाशीरा नदीला पुर आला आहे. यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे 

▪️पशुधन दिले सोडुन

वाकडी येथील काही घरे व गोठ्यांच्या भोवती पाण्याचा वेढा वाढत असल्याचे पाहुन पशुधनाला मोकळे सोडण्यात आले होते. यामुळे पाण्यात हे पशुधन पोहत असल्याचे दिसून येत आहे.

▪️लासरा येथील शाळा पाण्यात

मांजरा पट्ट्यातील लासरा गावाला पुराच्या पाण्याने स्पर्श केला असून गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत पाण्यात सापडली आहे. जवळपास आठ फूट पाणी चढले होते.

▪️विविध मार्गावरील वाहतूक बंद

तालुक्यातील वाशीरा नदीला पुर आल्याने लातूर कळंब राज्यमार्ग आथर्डी गावाजवळ पुलावर पाणी आल्याने बंद झाला आहे. भाटशिरपुरा येथील पुलावरील पाण्यामुळे कळंब ढोकी राज्यमार्ग बंद झाला आहे. कळंब अंबाजोगाई राज्यमार्ग पण पहाटे बंद झाला होता. खामसवाडी, मंगरूळ येथील रस्ते पाण्यामुळे बंद झाले होते. अनेक लहान गावाना जोडणारे रस्ते पाण्यात होते.

टॅग्स :RainपाऊसManjara Damमांजरा धरणOsmanabadउस्मानाबाद